Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Congress Politics : काँग्रेसही तरुण राष्ट्रीय कार्याध्यक्षाच्या शोधात? ‘या’ नावांची जोरदार चर्चा सुरु

आगामी काळात तमिळनाडू, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी या पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 07, 2026 | 12:03 PM
Congress Politics : काँग्रेसही तरुण राष्ट्रीय कार्याध्यक्षाच्या शोधात; 'या' नावांची जोरदार चर्चा सुरु

Congress Politics : काँग्रेसही तरुण राष्ट्रीय कार्याध्यक्षाच्या शोधात; 'या' नावांची जोरदार चर्चा सुरु

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच भाजपच्या पावलावर पाऊल टाकत काँग्रेसमध्येही मोठ्या संघटनात्मक बदलांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी 2029 च्या लोकसभा निवडणुका आणि त्यापूर्वी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता, काँग्रेस पक्ष आता तरुण अध्यक्षाबाबत विचार करत असल्याची माहिती सध्या दिली जात आहे.

भारतीय जनता पक्षाने नुकतेच बिहारचे नेते नितीन नवीन यांची ‘राष्ट्रीय कार्याध्यक्ष’ पदी नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीने सर्वांनाच धक्का दिला होता. आगामी काळात तमिळनाडू, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी या पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वीच पक्ष नेतृत्वात बदल करून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्याचा काँग्रेसचा मानस आहे.

दरम्यान, महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन पायलट यांचे नाव या पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आहे. सचिन पायलट यांना राष्ट्रीय राजकारणात आणल्यास राजस्थानमधील अशोक गहलोत आणि पायलट यांच्यातील वाद मिटण्यास मदत होईल.

पायलट यांची दिल्लीच्या राजकारणात मोठी भूमिका

पायलट यांची दिल्लीच्या राजकारणात मोठी भूमिका निश्चित करण्यासाठी त्यांना हे पद दिले जाऊ शकते. तसेच कर्नाटकचे मंत्री आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांच्या नावाचाही विचार सुरू आहे.

काँग्रेसमध्येही निर्माण होणार पद?

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे त्यांचे वय आणि प्रकृती स्वास्थ्य लक्षात घेता २०२९ च्या निवडणुकीपर्यंत त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी पक्षाला एका तरुण चेहऱ्याची गरज भासत आहे. भाजपने जे. पी. नड्डा यांच्यासोबत नितीन नवीन यांना राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्त केले. आता हेच मॉडेल काँग्रेस राबवू शकते. भाजपप्रमाणेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष हे नवीन पद निर्माण करण्याबाबत काँग्रेस श्रेष्ठींमध्ये गंभीर चर्चा सुरू आहे.

पाच राज्यांतील निवडणुका मुख्य लक्ष्य

आगामी काळात तमिळनाडू, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी या पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वीच पक्ष नेतृत्वात बदल करून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्याचा काँग्रेसचा मानस आहे. अनुभवी नेतृत्वाला तरुणाच्या उत्साहाची जोड देऊन भाजपच्या रणनीतीला प्रत्युत्तर देण्याची तयारी काँग्रेसने केली असल्याची चर्चा आहे.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics : राज्यातील 32 जिल्हा परिषदांसह 336 पंचायत समितीच्या निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता

Web Title: Congress is also searching for a young national working president sachin pilot and priyank kharge names are at the forefront

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • Congress Politics
  • political news
  • sachin pilot

संबंधित बातम्या

भाजपचा बिनविरोधचा डाव फसला; काँग्रेस उमेदवाराने नाकारली 10 लाखांची ऑफर
1

भाजपचा बिनविरोधचा डाव फसला; काँग्रेस उमेदवाराने नाकारली 10 लाखांची ऑफर

उत्तर प्रदेशच्या SIR यादीतून २.८९ कोटी लोकांची नावे होणार बाद; निवडणूक आयोगाकडे लागले सर्वांचे लक्ष
2

उत्तर प्रदेशच्या SIR यादीतून २.८९ कोटी लोकांची नावे होणार बाद; निवडणूक आयोगाकडे लागले सर्वांचे लक्ष

Santosh Dhuri in BJP : राज साहेबांची हिरवं रक्त असलेल्या लोकांशी युती…! कमळ हाती घेताच संतोष धुरींनी केली आगपाखड
3

Santosh Dhuri in BJP : राज साहेबांची हिरवं रक्त असलेल्या लोकांशी युती…! कमळ हाती घेताच संतोष धुरींनी केली आगपाखड

प्रभाग २६ मध्ये भाजपचा जयघोष; ‘काम करत आलोय, काम करत राहणार’ – ऐश्वर्या सम्राट थोरात यांचा विजयाचा निर्धार
4

प्रभाग २६ मध्ये भाजपचा जयघोष; ‘काम करत आलोय, काम करत राहणार’ – ऐश्वर्या सम्राट थोरात यांचा विजयाचा निर्धार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.