Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप नेत्याने वैयक्तिक देणगीतून उभी केली विद्युतदाहिनी; मनसेच्या कार्यकर्त्यांनी येऊन केली तोडफोड

भाजपचे नेते (BJP leader), अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री (former Guardian Minister of Amravati district) व विद्यमान आमदार प्रवीण पोटे (MLA Praveen Pote) यांनी तीस लाख रुपयांची वैयक्तिक देणगी (personal donation) देऊन उभारण्यात आलेल्या विद्युत दाहिनीची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा प्रकार अमरावती येथे उघडकीस आला आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 29, 2021 | 07:30 PM
भाजप नेत्याने वैयक्तिक देणगीतून उभी केली विद्युतदाहिनी; मनसेच्या कार्यकर्त्यांनी येऊन केली तोडफोड
Follow Us
Close
Follow Us:

अमरावती (Amravati).  भाजपचे नेते (BJP leader), अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री (former Guardian Minister of Amravati district) व विद्यमान आमदार प्रवीण पोटे (MLA Praveen Pote) यांनी तीस लाख रुपयांची वैयक्तिक देणगी (personal donation) देऊन उभारण्यात आलेल्या विद्युत दाहिनीची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा प्रकार अमरावती येथे उघडकीस आला आहे.

[read_also content=”गडचिरोली/ चंद्रपूरनंतर आणखी एका जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यावर राज्य शासनाचा विचार https://www.navarashtra.com/latest-news/the-state-government-is-considering-lifting-the-liquor-ban-in-another-district-after-chandrapur-nrat-135353.html”]

कोविड काळात अमरावतीच्या मध्यवस्तीत असलेल्या हिंदू स्मशानावर येणारा अंत्यसंस्कारांचा ताण शहरात असलेल्या विविध स्मशानांकडे वळता करून या परिसरातील लोकांना होणारा त्रास कमी करावा यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान या स्मशानावरील वाढलेला ताण पाहता तिसरी विद्युत दाहिनी शहरातील इतर कुठल्या स्मशानात लावून दुसरेही स्मशान विकसित करावे, या मागणीसाठी दोन दिवस आधी अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमी समोर नागरिकांनी मूक आंदोलन केले होते.

हिंदू स्मशानभूमीमध्ये सद्य स्थितीत 2 गॅस दाहिन्या आहेत. त्यामध्ये दिवसभर कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येते. स्मशानभूमीतील राख लोकांच्या घरात जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे स्मशानभूमीत उभारण्यात येणारी तिसरी दाहिनी दुसऱ्या ठिकाणी बसवावी व दुसरे स्मशान विकसित करावे अशी मागणी स्थानिकांनी केली होती. या स्मशानभूमीत तिसरी शवदाहिनी बसू नये यासाठी गेल्या महिन्याभरापासून मनपा आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय आदी ठिकाणी परिसरातील नागरिकांनी निवेदने दिली आहेत.

मात्र आज अचानक तिसरी गॅस दाहिनी आणल्यामुळे स्थानिक महिला तिथे पोहचल्या व संतप्तपणे तिसरी दाहिनी अडवली. काही वेळातच याठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा दाखल झाले. यानंतर या परिसरातील महिला व नागरिक चांगलेच आक्रमक झाले.

मनसे कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांनी या शवदाहिनीची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. तसेच या दाहिनी सोबत आलेल्या साहित्याची तोडफोड तोडफोड करून नासधूस केली. या गॅस शव दाहिनी साठी भाजपचे नेते अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार प्रवीण पोटे यांनी तीस लाख रुपयाची वैयक्तिक देणगी दिली आहे. मात्र भाजपचा नेत्याने दिलेल्या देणगीतून होत असलेल्या गॅस शवदाहिनीला या परिसरातील चारही भाजपच्या नगरसेवकांचा व काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याने भारतीय जनता पक्षात गटातटाचे राजकारण तर सुरू झाले नाही ना, अशी शंका येत आहे. विशेष म्हणजेे महानगरपालिके भाजपची सत्ता आहे.

Web Title: Bjp leader raises electricity from personal donations mns workers came and carried out vandalism nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2021 | 07:30 PM

Topics:  

  • Amravati District
  • BJp leader

संबंधित बातम्या

BJP Crime News: पती, पत्नी और ‘वो’! भाजप नेत्याचे कांड…; गळा घोटून पत्नीची केली हत्या
1

BJP Crime News: पती, पत्नी और ‘वो’! भाजप नेत्याचे कांड…; गळा घोटून पत्नीची केली हत्या

राज पुरोहित अन् प्रवक्ते अवधूत वाघ यांना झाला साक्षात्कार; नरेंद्र मोदी हे विष्णुचे 11 वे अवतार
2

राज पुरोहित अन् प्रवक्ते अवधूत वाघ यांना झाला साक्षात्कार; नरेंद्र मोदी हे विष्णुचे 11 वे अवतार

क्षमता १० जणांची, लिफ्टमध्ये चढले १७ जण; भाजप नेते प्रविण दरेकरही अडकले, दरवाजा तोडून केली सुटका, पाहा VIDEO
3

क्षमता १० जणांची, लिफ्टमध्ये चढले १७ जण; भाजप नेते प्रविण दरेकरही अडकले, दरवाजा तोडून केली सुटका, पाहा VIDEO

Trupti Desai : दारू पितो, दहशत माजवतो, अन् महिलांना; तृप्ती देसाईंचे भाजप नेत्यांवर गंभीर आरोप, पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी
4

Trupti Desai : दारू पितो, दहशत माजवतो, अन् महिलांना; तृप्ती देसाईंचे भाजप नेत्यांवर गंभीर आरोप, पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.