uma bharati
भोपाळ : भाजपच्या (Bharatiya Janata Party) ज्येष्ठ नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती (Uma Bharati) यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर (Lok Sabha Elections Result 2024) मोठा दावा केला आहे. एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा भाजप जास्त जागा जिंकणार असल्याचा अंदाज उमा भारती यांनी व्यक्त केला आहे.
हिमालयात दीर्घ मुक्काम करून परतलेल्या उमा भारती यांनी भाजप 450 हून अधिक जागा जिंकेल, असे म्हटले आहे. यावेळी भाजपने 400 पार करण्याचा नारा दिला आहे हे विशेष. त्यांनी मोदींचे कौतुक केले. उमा भारती यांनी मतमोजणीच्या एक दिवस आधी सोमवारी ट्विटरवर एका पोस्टद्वारे भाजपच्या दणदणीत विजयाचा विश्वास व्यक्त केला.
उमा भारती यांनी म्हटलं की, ‘हिमालयात देशभरातून आलेल्या लोकांना भेटल्यानंतर त्यांना ही कल्पना सुचली. त्यांनी लिहिले, ‘परवा एक्झिट पोल आला, त्यांचे अंदाज काहीही असले तरी माझा अंदाज साडेचारशेपेक्षा कमी असू शकत नाही’.