Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लशी आणि आपत्कालीन वैद्यकीय साहित्याच्या वितरणासाठी प्रायोगिक तत्वावर अनमॅन्ड एअरक्राफ्ट सिस्टिम (युएएस) चालविण्यासाठी ब्लू डार्टने केली ब्लू डार्ट मेड-एक्स्प्रेस काँसोर्टियमची स्थापना

आरोग्यसेवेशी संबंधित वस्तूंची (औषधे, कोव्हिड-१९ लशी, रक्ताचे युनिट्स, निदानासाठीचे नमुने आणि इतर जीवनरक्षक उपकरणे) वितरण केंद्रावरून विशिष्ट स्थळी व तिथून पुन्हा केंद्रापर्यंत सुरक्षित,अचूकपणे आणि विश्वासार्ह ने-आण करण्यासाठी एका पर्यायी दळणवळण मार्गाची चाचपणी करणे हा या प्रकल्पाचा हेतू आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: May 15, 2021 | 07:30 AM
लशी आणि आपत्कालीन वैद्यकीय साहित्याच्या वितरणासाठी प्रायोगिक तत्वावर अनमॅन्ड एअरक्राफ्ट सिस्टिम (युएएस) चालविण्यासाठी ब्लू डार्टने केली ब्लू डार्ट मेड-एक्स्प्रेस काँसोर्टियमची स्थापना
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : वेगवान दळणवळण सेवा पुरवठा क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य कंपनी असा नावलौकिक असलेल्या व डॉइश पोस्ट डीएल ग्रुप (डीपीडीएचएल)चा भाग असलेल्या ब्लू डार्टने ड्रोनद्वारे भारताच्या दुर्गमातिदुर्गम भागांतही लशी आणि आपत्कालीन वैद्यकीय साहित्याच्या वितरणाच्या क्रांती घडवून आणण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवत ब्लू डार्ट मेड-एक्स्प्रेस काँसोर्टियमची स्थापना केली आहे. ब्लू डार्ट मेड-एक्स्प्रेस काँसोर्टियम हे तेलंगणा सरकार, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, नीती आयोग आणि हेल्थनेट ग्लोबल यांच्या सहयोगाने चालविण्यात येत असलेल्या ‘मेडिसीन फ्रॉम द स्काय’या प्रकल्पाचा भाग आहे.

या प्रकल्पाअंतर्गत तेलंगणामध्ये प्रायोगिक तत्वावर ड्रोन फ्लाइट्सच्या उड्डाणांसाठी आवश्यक ती सूट आणि हक्क नागरी उड्डाण मंत्रालयाकडून (एमओसीए) देण्यात आले आहेत. आरोग्यसेवेशी संबंधित वस्तूंची (औषधे, कोव्हिड-१९ लशी, रक्ताचे युनिट्स, निदानासाठीचे नमुने आणि इतर जीवनरक्षक उपकरणे) वितरण केंद्रावरून विशिष्ट स्थळी व तिथून पुन्हा केंद्रापर्यंत सुरक्षित,अचूकपणे आणि विश्वासार्ह ने-आण करण्यासाठी एका पर्यायी दळणवळण मार्गाची चाचपणी करणे हा या प्रकल्पाचा हेतू आहे.

पुरवठा साखळीच्या पायाभूत यंत्रणेमध्ये सुधारणा घडवून आणण्याप्रती ब्लू डार्ट कटिबद्ध आहे व महामारीचा सामना करण्यासाठी कंपनीकडून तगडी झुंज दिली जात आहे. तेलंगणामध्ये आरोग्यसेवेशी संबंधित वस्तूंच्या दळणवळणासाठी सध्या कार्यरत असलेल्या यंत्रणेला अधिकाधिक सक्षम बनविण्यासाठी ब्लू डार्ट मेड-एक्स्प्रेस ड्रोन फ्लाइट्सकडून एक इमर्सिव्ह डिलिव्हरी मॉडेल अर्थात वितरणाची सर्वांगिण व्यवस्था करण्यात येणार आहे. या मॉडेलमुळे जिल्हा पातळीवरील मेडिकल स्टोअर्स आणि रक्तपेढ्यांमधून प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी) सार्वजनिक आरोग्य केंद्रे (सीएचसी), ब्लड स्टोअरेज युनिट्सपर्यंत वस्तूंचे वितरण करणे आणि त्यानंतर पीएचसी/सीएचसीमधून केंद्रिय निदान प्रयोगशाळांपर्यंत साहित्य पोहोचवणे शक्य होणार आहे.

महामारीशी सुरू असलेल्या सामन्यामध्ये देशाची मदत करण्याची संधी मिळाल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे सांगत ब्लू डार्टचे मॅनेजिंग डायरेक्टर बॅलफोर मॅन्युएल म्हणाले, “एका वर्षाहून अधिक काळ लोटला आहे आणि कोव्हिड-१९ विरोधातले आपले युद्ध अजूनही काही अशी नवीन आव्‍हाने समोर ठेवत आहे, ज्यासाठी तत्काळ उपाययोजनांची गरज भासत आहे. महामारीने आपल्यातील प्रत्येकालाच दळणवळणाचे महत्त्व आणि तंत्रज्ञान-संचालित पुरवठा साखळी यंत्रणेची गरज पटवून दिली आहे. एक संस्था या नात्याने ब्लू डार्टने नेहमीच भविष्यवेधी तंत्रज्ञानाचा सर्वांगिण वापर केला आहे. याच क्षमतेमुळे आम्हाला महामारीमध्येही टिकून आपले पाय घट्ट रोवून उभे राहणे शक्य झाले आहे, इतकेच नव्हे तर भरभराट आणि विकासही साधता आला आहे. सध्या आम्ही देशभरातील ३५,०००हून अधिक स्थळी वितरण सुविधा पोहोचविण्याची क्षमता बाळगून असलो, तरीही सध्याच्या स्थितीमध्ये लशींच्या पुरविठ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्याची गरज निर्माण झाली आहे.”

लशींच्या वितरणासाठी बियाँड व्हिज्युअल लाइन ऑफ साइटसाठी (बीव्‍हीएलओएस) ड्रोन फ्लाइट्सच्या वापराचा प्रयोग करून पाहण्याविषयी आपले मत नोंदविताना केतन कुलकर्णी, सीएमओ आणि हेड – बिझनेस डेव्‍हलपमेंट, ब्‍लू डार्ट म्हणाले, “सुरक्षित, कार्यक्षम आणि किफायतशीर ड्रोन डिलिव्हरी फ्लाइट्स सेवा कार्यरत करणे हे या कन्सोर्टियमचे लक्ष्य आहे. कार्यतत्पर यंत्रणा राबवली गेल्यास त्यामुळे सध्या दळणवळासाठी येणाऱ्या खर्चात बचत होऊ शकते व आरोग्यसेवेशी निगडित साहित्याची ने-आण अधिक वेगाने आणि सुयोग्य पद्धतीने होऊ शकते. या ड्रोन उड्डाणांसाठी आवश्यक ते अधिकार आम्हाला देण्यात आले आहेत, याचा आम्हाला आनंद आहे व ही खरोखरंच सध्याच्या काळाची गरज आहे. सध्या मानवजातीसाठी सर्वात बिकट काळ सुरू आहे. अशा काळात आपण ज्या समाजामध्ये काम करतो त्या समाजाचे ऋण फेडण्याशी असलेली आपली बांधिलकी ब्लू डार्ट सातत्याने जपत आहे आणि या कामामध्ये एक पाऊल पुढे टाकण्यासाठी कंपनी सदैव सज्ज राहणार आहे. “

तेलंगणा सरकारच्या आयटीईॲण्‍डसी विभागाच्या ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी (ओएसडी)आणि डायरेक्टर ऑफ इमर्जिंग टेक्नोलॉजीज रमा देवी लंका म्हणाल्या, “हा प्रकल्प आम्हाला भविष्यामध्ये अंमलात आणावयाच्या धोरणांना गती देण्याच्या दृष्टीने तसेच त्यांचे विद्यमान आरोग्यसेवा पुरवठा साखळीबरोबर एकत्रीकरण करण्यासाठी खऱ्याखुऱ्या आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरविता येण्याजोगे ज्ञान व अनुभव मिळवून देऊ शकेल. कोव्हिड-१९ महामारीमुळे सध्या कार्यरत पुरवठा साखळीवर आत्यंतिक ताण येत आहे व अशाप्रकारे बदल घडवून आणणाऱ्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ही काळाची गरज बनली आहे.”

तेलंगणा सरकारच्या आयटीईॲण्‍डसीविभागाचे प्रन्सिपल सेक्रेटरी, आयएएस जयेश रंजन म्हणाले, “तेलंगणा हे उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याच्या संधींचा शोध घेणाऱ्या सर्वाधिक सक्रिय राज्यांपैकी एक राज्य आहे व ड्रोनचा वापर करणारा ‘मेडिसीन फ्रॉम द स्काय’ प्रकल्प याच तत्वाशी मेळ साधणारा आहे. हा प्रकल्प देशात राबवल्या जाणाऱ्या अशा काही पहिल्यावहिल्या कार्यक्रमांपैकी एक आहे, जिथे अनेक ड्रोन्स बीव्‍हीएलओएस म्हणजे नजरेच्या टप्प्याच्या पलीकडे उड्डाण घेतील व आरोग्यसेवा पुरवठा साखळीतील आपले मूल्य प्रस्थापित करतील. ग्रामीण भागांपर्यंत आरोग्यसेवा समान पद्धतीने पुरवल्या जाव्यात याची खातरजमा करण्याचे लक्ष्य यामागे आहे.”

ब्लू डार्टने महामारीशी सुरू असलेल्या युद्धामध्ये देशाला सातत्याने पाठबळ पुरवले आहे. देशाच्या व्यापारउदीमासाठी सुविधा निर्माण करणारी संस्था म्हणून ब्लू डार्टने देशभरात अत्यावश्यक वस्तूंचे वितरण सुरक्षितरित्या आणि खात्रीलायक पद्धतीने केली आहे व लोकांचे आयुष्य ठप्प होणार नाही याची काळजी वाहिली आहे. आपली बांधिलकी आणि तत्व यांच्याशी इमान राखत ब्लू डार्टमधील कर्मचारी अथकपणे काम करत आहेत व देश महामारीच्या विळख्यात सापडल्यापासूनच अतीमहत्त्वाच्या वस्तूंची पुरवठा साखळी कार्यरत ठेवण्याची आपली मोहीम अखंड सुरू राहील याची हमी देत आहेत. ही पुरवठा साखळी कार्यरत ठेवण्यासाठी आणि कोव्हिड लशींचे नमुने, विशिष्ट तापमानाची गरज असलेली कोव्हिड-१९ टेस्टिंग किट्स, पीपीई, टेस्टिंग किट्स, रीजंट्स, एन्झाइम्स, रेस्पिरेटर्स, सर्जिकल मास्क्स, गॉगल्स आणि ग्लव्ह्जसह अत्यंत महत्त्वाच्या सामुग्रीचे वितरण करण्यासाठी ब्लू डार्ट वैद्यकीय उपकरणे आणि औषधनिर्मिती क्षेत्राच्या साथीने सातत्याने काम करत आहे. कंपनीची सहा बोइंग 757 फ्राइटर्समुळे ही वाहतुक सेवा सुरळीतपणे व विनाअडथळा चालत आहे व मोठ्या प्रमाणात मालवाहतूक हाताळली जात आहे.

Blue Dart establishes Blue Dart Made-Express for the distribution of vaccines and emergency medical supplies

Web Title: Blue dart establishes blue dart made express for the distribution of vaccines and emergency medical supplies nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2021 | 07:30 AM

Topics:  

  • Blue Dart

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.