सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांच्या आरोपांवर सीईओ दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. एका टीव्ही न्यूज चॅनलच्या मुलाखतीदरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी मानसिक त्रास दिला आणि पैशाची मागणी केल्याचा आरोप ग्लोबल टिचर डिसले (Ranjitsinh Disale) यांनी केला होता. या आरोपावर सीईओ स्वामी यांनी चौकशी करणार असल्याचे नोटीसाद्वारे जाब विचारला आहे.
राज्यपाल यांचा दौरा माढा तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेस भेट देणार होते. या निमित्ताने ग्लोबल टिचर डिसले आणि सीईओ यांच्याशी दोनवेळा संपर्क झाले. मात्र, संपर्क दरम्यान मानसिक त्रास अथवा लाचेची मागणी होत असल्याचे सीईओ यांच्या निर्दशनास आणले नसल्याचा ठपका नोटीस ठेवण्यात आला आहे.
गेल्या चार दिवसांपासून ग्लोबल टिचर डिसले अध्ययन रजा मागण्यावरून चांगलेच चर्चेत आहेत. स्वत: ग्लोबल गुरुजी डिसले हे झेडपी शिक्षक असताना प्रशासनाला दिशाभूल करीत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. परदेशात अध्ययनासाठी आवश्यक ती कागदपत्रे ग्लोबल गुरुजी डिसले यांच्याकडे उपलब्ध नसताना केवळ राजकीय नेते मंडळीचा आधार घेत आध्यन रजाची मंजूरी घेतल्याचं बोललं जात आहे.
कोरोना संसर्गाच्या प्रतिबंध पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ग्रामसेवक, शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी काढलेल्या आदेशाचा दणका ग्लोबल गुरुजी रणजितसिंह डिसले यांना बसला आहे. त्यांच्यावर एक दिवसीय बिनपगारीची कारवाई करण्यात आली आहे. डिसले गुरुजी गुरुवारी जिल्हा परिषद मुख्यालयात आले होते. ते विनापरवाना आले म्हणून परितेवाडी शाळेतील त्यांची हजेरी बिनपगारी करण्यात आली आहे, असे माहिती स्वतः डिसले यांनीच प्रसारमाध्यमांना दिली आहे.
रणजितसिंह डिसले हे गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय सेवेत गैरहजर राहिल्याने ते प्रशासकीय कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी रणजितसिंह डिसले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डिसले गेल्या तीन वर्षांपासून नेमणूक असलेल्या शाळेकडे फिरकलेच नाही, तीन वर्षांच्या काळात डिसले गुरुजींनी काय काम केलं? याबाबत चौकशी समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाला आहे. प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी राजकीय दबाव आणला आहे. शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी म्हटलंय.
रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप यांना जाहीर झाली आहे. या विषयावर संशोधन करण्यासाठी त्यांना सहा महिने अमेरिकेत जाऊन अभ्यास करायचे आहे. यासाठी १ महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेकडे अध्यापन रजा मिळवण्यासाठी अर्ज केला होता.
गुरुवारी जेव्हा टिचर डिसले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भेटीला गेले होते, तेव्हा सादर केलेल्या अर्जामध्ये त्रुटी असल्याचं सांगितलं गेले होते. त्यांना संबंधित मुख्याध्यापक यांच्याकडे अर्ज देण्यासाठी सांगितले होते. दरम्यान, १५३ दिवसांच्या परदेश अध्ययनासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आली आहे.