Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नेट’,‘सेट’ परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक; परीक्षा शुल्कापोटी कोट्यवधी रुपये उकळले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेचा आरोप

प्राध्यापक होण्याचे स्वप्न (becoming a professor) घेऊन पोस्ट ग्रॅज्युएट झालेले (Many post graduates) अनेक विद्यार्थी नेट सेट परीक्षेची तयारी (the net set exam) करतात. मात्र, प्राध्यापकांची भरतीच होत नसल्याने परीक्षा दिलेले अनेक विद्यार्थी बेरोजगार (become unemployed) होऊनच बसले आहेत. परीक्षेचे भरसाठ शुल्क (paying a hefty exam fee) भरल्यानंतर स्वप्नांचा आणि पैशांचा चुराडा होत असल्याने विद्यार्थ्यांची निराशा होते. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (University Grants Commission) दरवर्षी दोन वेळा या परीक्षा घेतल्या जातात.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 22, 2021 | 12:05 AM
‘नेट’,‘सेट’ परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक; परीक्षा शुल्कापोटी कोट्यवधी रुपये उकळले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेचा आरोप
Follow Us
Follow Us:

नागपूर (Nagpur).  प्राध्यापक होण्याचे स्वप्न (becoming a professor) घेऊन पोस्ट ग्रॅज्युएट झालेले (Many post graduates) अनेक विद्यार्थी नेट सेट परीक्षेची तयारी (the net set exam) करतात. मात्र, प्राध्यापकांची भरतीच होत नसल्याने परीक्षा दिलेले अनेक विद्यार्थी बेरोजगार (become unemployed) होऊनच बसले आहेत. परीक्षेचे भरसाठ शुल्क (paying a hefty exam fee) भरल्यानंतर स्वप्नांचा आणि पैशांचा चुराडा होत असल्याने विद्यार्थ्यांची निराशा होते. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (University Grants Commission) दरवर्षी दोन वेळा या परीक्षा घेतल्या जातात. या दरम्यान विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्काच्या नावाआड कोट्यवधी रुपये उकळले जातात, असा आरोप महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेने (Maharashtra New Professors’ Association) (MNA)केला आहे.

उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी ‘नेट’ आणि ‘सेट’ ही प्राध्यापक पात्रता परीक्षा शासनाच्या कमाईचे जणू साधन ठरली आहे. दरवर्षी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जात असताना प्राध्यापक भरतीचे केवळ आश्वासनच दिले जात आहे. विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्कापोटी कोट्यवधी रुपये उकळले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेने केला आहे.

[read_also content=”नागपूर जिल्ह्यात आता केवळ १७ हजार ०५४ कोरोना Active रुग्ण; जिल्ह्यात शुक्रवारी आढळले १००० नवीन कोरोना रुग्णCorona https://www.navarashtra.com/latest-news/corona-updates-now-only-17-thousand-054-corona-active-patients-in-nagpur-district-1000-new-corona-patients-were-found-in-the-district-on-friday-132272.html”]

‘नेट’ परीक्षा ही ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’कडून घेतली जाते. तर ‘सेट’ परीक्षा विविध राज्यांमध्ये घेतली जाते. या परीक्षा दरवर्षी न चुकता होत असतात. दिवसेंदिवस या परीक्षांचा दर्जा व गुणवत्ता खालावत चालल्याने निकालातही मोठी वाढ होत आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून राज्यामध्ये प्राध्यापक भरती बंद आहे. तरीदेखील राज्यात दरवर्षी नेट आणि सेट मिळून दहा हजारांहून पात्रताधारकांची भर पडत आहे. सध्या राज्यात जवळपास पन्नास हजार नेट-सेट पात्रताधारक प्राध्यापक पदभरतीच्या प्रतीक्षेत आहेत. ‘सेट’ परीक्षेसाठी जाहिरात प्रकाशित झाल्याने नेट-सेट पात्रताधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

महाराष्ट्रात नुकताच सेट परीक्षा २०२० चा निकाल जाहीर झाला. यासाठी राज्यातून एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षेला ६१ हजार उमेदवार उपस्थित होते. या परीक्षेचे शुल्क सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ८०० रुपये तर मागासवर्गीयांसाठी ६५० रुपये होते. यातून एका परीक्षेत सात ते आठ कोटी रुपये परीक्षेच्या नावाखाली जमा झाले. नेट परीक्षा वर्षातून न चुकता दोनदा घेतली जाते. यासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००० रुपये तर मागासवर्गीयांसाठी ५०० रुपये शुल्क आकारले जाते. म्हणजे यूजीसीकडून कोट्यवधी रुपये परीक्षेच्या नावावर उकळले जातात.

Web Title: Cheating students under the guise of net set exams maharashtra new professors association alleges that crores of rupees are being boiled down in examination fees nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2021 | 12:05 AM

Topics:  

  • National Testing Agency

संबंधित बातम्या

NTA चा मोठा निर्णय! ६०० तज्ज्ञांना हटवून परीक्षा विभागाची पुनर्रचना; परीक्षा प्रणाली होणार अधिक पारदर्शक!
1

NTA चा मोठा निर्णय! ६०० तज्ज्ञांना हटवून परीक्षा विभागाची पुनर्रचना; परीक्षा प्रणाली होणार अधिक पारदर्शक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.