Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JEE Main 2027: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘आधार कार्ड आणि १० वीच्या मार्कशीटमध्ये….’ ? NTA चा मोठा निर्णय

JEE Main 2027 Registration Rules: JEE Main 2027 साठी अर्ज करताना आधार कार्ड आणि १० वीच्या मार्कशीटवरील नावांमध्ये तफावत असल्यास उमेदवारी रद्द होणार नाही, असे NTA स्पष्ट केले आहे. तसेच APAAR आयडी अनिवार्य नसून सत्र १ साठी २२ नोव्हेंबर २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 17, 2026 | 09:54 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • आधार कार्ड आणि १० वीच्या मार्कशीटमध्ये नाव वेगळे असल्यास अर्ज रद्द होणार का?
  • APAAR आयडी अनिवार्य आहे का?
  • जेईई मेन २०२७ सत्र १ च्या महत्त्वाच्या तारखा
JEE Main 2027 Registration Rules: देशातील सर्वात मोठी इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा असलेल्या ‘जेईई मेन २०२७’ (JEE Main 2027) साठी अर्ज करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) मोठा दिलासा दिला आहे. अर्ज करताना अनेकदा विद्यार्थ्यांना अशी चिंता असते की, त्यांच्या आधार कार्ड आणि १० वीच्या मार्कशीटवरील नावाच्या स्पेलिंगमध्ये किंवा तपशिलामध्ये काही तफावत असल्यास त्यांचा अर्ज रद्द होईल का? मात्र, आधार कार्ड आणि १० वीच्या प्रमाणपत्रावरील नावे वेगवेगळी असली, तरी त्यामुळे उमेदवाराच्या पात्रतेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे NTA ने स्पष्ट केले आहे.

एजन्सीने विद्यार्थ्यांच्या सामान्य अडचणी दूर करण्यासाठी ४८ वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची (FAQs) सविस्तर यादी जाहीर केली आहे. यामध्ये नोंदणी, डिजीलॉकर, APAAR आयडी, पात्रता परीक्षा, शहर निवड आणि करेक्शन विंडोशी संबंधित अनेक महत्त्वाच्या नियमांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

आधार आणि १० वीच्या मार्कशीटमधील नावाच्या फरकाचा नियम

NTA च्या स्पष्टीकरणानुसार, उमेदवारांना जेईई मेन २०२७ च्या अर्ज पत्रामध्ये आपले नाव अगदी तसेच भरावे लागेल, जसे त्यांच्या १० वीच्या मार्कशीटमध्ये नोंदवले आहे. जरी आधार कार्डवर नाव थोडे वेगळे असले, तरी फॉर्म भरताना तुम्हाला १० वीच्या कागदपत्रांचेच अनुसरण करावे लागेल. अशा प्रकारच्या तफावतीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याची उमेदवारी धोक्यात येणार नाही, असे एजन्सीने स्पष्ट केले आहे.

APAAR आयडी आणि डिजीलॉकरबाबत अपडेट

NTA ने हे देखील स्पष्ट केले आहे की, जेईई मेन २०२७ च्या नोंदणीसाठी APAAR आयडी अनिवार्य नाही. विद्यार्थी याशिवायही आपला अर्ज पूर्ण करू शकतात. तसेच, नोंदणी सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्यांचे डिजीलॉकर री-केवायसी पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून अर्ज कन्फर्मेशन पेजवर त्यांचा लेटेस्ट फोटो योग्य प्रकारे प्रदर्शित होऊ शकेल. डिजीलॉकर लॉगिनमध्ये काही समस्या आल्यास, विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या लॉगिन क्रेडेन्शियल्सद्वारे पुन्हा प्रयत्न करू शकतात.

CTET exam 2026: सरकारी शिक्षक होण्याचे स्वप्न होणार पूर्ण! ‘या’ स्मार्ट नियोजनाने करा परीक्षा उत्तीर्ण

अर्जाशी संबंधित इतर महत्त्वाची माहिती

कॅटगरी सर्टिफिकेट: जेईई मेन २०२७ साठी नोंदणी करताना कॅटगरी प्रमाणपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही. परंतु, प्रमाणपत्र जारी झाल्याची तारीख आणि जारी करणाऱ्या प्राधिकाऱ्याचा तपशील भरणे अनिवार्य आहे.

१२ वीचा रोल नंबर: जे विद्यार्थी २०२६-२७ मध्ये १२ वीची परीक्षा देत आहेत, त्यांना रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर जारी न झाल्यास ‘Not Available’ हा पर्याय निवडता येईल. तसेच इम्प्रूवमेंट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘Passed’ हा पर्याय निवडावा लागेल.

परीक्षा शहर आणि थेट फोटो : पत्त्याच्या अटींच्या अधीन राहून विद्यार्थी जास्तीत जास्त चार पसंतीची परीक्षा शहरे निवडू शकतात. तसेच सिस्टीमद्वारे लाईव्ह फोटो स्विकारला गेला नाही, तर उमेदवार तो अनेकदा पुन्हा क्लिक करू शकतात.

सत्र २ साठी वेगळा फॉर्म: एप्रिल २०२७ मध्ये होणाऱ्या दुसऱ्या सत्रात सहभागी होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र अर्ज सादर करावा लागेल.

Cats employees: डेस्कवर बसण्यापूर्वी मांजरी करतात स्वागत! जपानमधील ‘या’ अनोख्या कंपनीत पाळीव प्राणीच आहेत फुल-टाइम कर्मचारी

जेईई मेन २०२७ सत्र १ च्या महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २२ नोव्हेंबर २०२६ रात्री ११:५० वाजेपर्यंत
  • लेट फी सह अर्ज: २३ ते २६ नोव्हेंबर २०२६
  • अर्ज करेक्शन विंडो: २७ ते २९ नोव्हेंबर २०२६
  • सत्र १ ची संभाव्य परीक्षा तारीख: २० ते ३० जानेवारी २०२७
  • सत्र २ नोंदणी: ५ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२७
💡

Frequently Asked Questions

  • Que: जेईई मेन २०२७ साठी अर्ज करताना आधार कार्ड आणि १० वीच्या मार्कशीटवरील नावामध्ये तफावत असल्यास अर्ज रद्द होतो का?

    Ans: नाही. NTA ने स्पष्ट केले आहे की, आधार कार्ड आणि १० वीच्या प्रमाणपत्रावरील नावांमध्ये तफावत असली तरी त्यामुळे उमेदवाराच्या पात्रतेवर किंवा अर्जावर कोणताही परिणाम होत नाही. फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी १० वीच्या मार्कशीटवरील नावाचाच वापर करावा.

  • Que: जेईई मेन २०२७ च्या नोंदणीसाठी APAAR आयडी अनिवार्य आहे का?

    Ans: नाही, जेईई मेन २०२७ च्या नोंदणीसाठी APAAR आयडी अनिवार्य नाही. विद्यार्थी याशिवायही आपला अर्ज यशस्वीपणे पूर्ण करू शकतात.

  • Que: जेईई मेन २०२७ सत्र १ (Session 1) साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कधीपर्यंत आहे?

    Ans: सत्र १ साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ नोव्हेंबर २०२६ (रात्री ११:५० वाजेपर्यंत) आहे. तसेच २३ ते २६ नोव्हेंबर २०२६ दरम्यान लेट फीसह अर्ज करता येईल.

Web Title: Jee main 2027 nta guidelines aadhaar name mismatch rules sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 09:54 AM

Topics:  

  • education
  • JEE
  • JEE exam
  • National Testing Agency

संबंधित बातम्या

NIFTEE 2027 Registration Extended: निफ्ट प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली; आता ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार फॉर्म!
1

NIFTEE 2027 Registration Extended: निफ्ट प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली; आता ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार फॉर्म!

Satellite Engineer Career Scope: इस्रोच्या मोहिमांनंतर स्पेस सेक्टरमध्ये मोठी संधी! सॅटेलाइट इंजिनिअर कसे बनवायचे? जाणून घ्या
2

Satellite Engineer Career Scope: इस्रोच्या मोहिमांनंतर स्पेस सेक्टरमध्ये मोठी संधी! सॅटेलाइट इंजिनिअर कसे बनवायचे? जाणून घ्या

एका GPU च्या शोधाने रचला इतिहास! जगातील सर्वात मोठया टेक कंपनीचे CEO Jensen Huang नेमकं किती शिकलेत?
3

एका GPU च्या शोधाने रचला इतिहास! जगातील सर्वात मोठया टेक कंपनीचे CEO Jensen Huang नेमकं किती शिकलेत?

Stanford Free AI Course: कसलं भारी! आता स्टैनफोर्ड युनिव्हर्सिटीत फ्रीमध्ये करता येणार एआय कोर्स; असा करा अर्ज!
4

Stanford Free AI Course: कसलं भारी! आता स्टैनफोर्ड युनिव्हर्सिटीत फ्रीमध्ये करता येणार एआय कोर्स; असा करा अर्ज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.