लेह, वृत्तसंस्था येथून नुकतीचं बातमी प्रकाशित करण्यात आली आहे, भारतीय सीमेवरील भागात कपटी चीनने आपल्या कुरापती सुरुच ठेवल्या आहेत. भारताबरोबर कमांडर स्तरावर चर्चा सुरू असताना पूर्व लडाख भागात चीनच्या लढाऊ विमाने घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे.
चीनचे (China) लढाऊ विमाने ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) १० कि.मी. अंतरा वरुन उड्डाण घेत आहेत. भारतीय संरक्षण व्यवस्था किती चोख आहे याचा अंदाज घेण्यासाठी या कुरापती सुरू असल्याचे मानले जात आहे. मागील तीन ते चार आठवडे चीनची लढाऊ विमाने ‘एलएसी’ परिसरात उड्डाण घेत आहेत.
मात्र भारतीय हवाई दल (Indian Air Force) सतर्क आहे. आणि अत्यंत जबाबदारीने सर्व परिस्थिती हाताळत आहे. भारतीय हवाईदल चीनकडून असणाऱ्या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे. त्याचबरोबर चीनच्या आक्रमकतेमध्ये वाढ होणार नाही, याचीही दक्षता हवाईदल घेत आहे.
चीनच्या (China) कुरापती सुरू असतानाचा भारतीय हवाईदलानेही(Indian) (Air Force) चीनला सडेतोड उत्तर देण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.
जे-११ लढाऊ विमानाद्वारे टेहळणी
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे के जे-११ या लढाऊ विमानासह अन्य विमानही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ उड्डाण घेत आहेत. मागील काही दिवसांमध्ये ‘एलएसी’च्या १० किलोमीटर परिसरात उभय देशांमधील विश्वास निर्माण करण्यासाठी करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
जूनपासूनच चिथावणीखोर कारवाया
या भागात चीनच्या (China) उड्डाण पद्धतींवरही बारीक लक्ष ठेवून आहे. चीनने एप्रिल-मे २०२० च्या कालमर्यादेत एलएसीवरील स्थिती एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न केल्यानंतर लडाखमधील लष्करी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी भारतदेखील वेगाने काम करत आहे. यापूर्वी २४-२५ जून रोजी पूर्व लडाखमध्ये चिनी लढाऊ विमानाने भारतीय सैनिकांच्या अगदी जवळून उड्डाण केले तेव्हा चिनी लढाऊ विमानांनी चिथावणी देण्यास सुरुवात केली.
…तर राफेल करणार कारवाई
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेना(air force) आपल्या राफेल लढाऊ विमानांद्वारे पूर्व लडाख सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर उड्डाण करत आहे, जे उत्तर सीमेजवळील अंबाला येथील त्यांच्या मूळ तळावरून फार कमी वेळात लडाखमध्ये पोहोचू शकते. १७ जुलै रोजी चुशुल मोल्डो सीमा बैठकीच्या ठिकाणी झालेल्या कॉर्प्स कमांडरच्या चर्चेदरम्यान हा मुद्दा चर्चेसाठी मांडण्यात आला होता, असे सूत्रांनी सांगितले. वायुदलप्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी काही दिवसांपूर्वीच चिनी लढाऊ विमानांच्या घुसखोरीवरून गंभीर इशारा दिला होता.