India's rivals Pakistan and Bangladesh reunite in Dhaka after 15 years
नवी दिल्ली/बीजिंग : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात पुन्हा एकदा आक्रमक धोरण स्वीकारत १०४ टक्के अतिरिक्त कर लागू केला आहे. अमेरिकेच्या या व्यापारधोरणामुळे अमेरिका-चीन व्यापारयुद्धात नव्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, चीनने आश्चर्यकारक पाऊल उचलत भारताकडे मैत्रीपूर्ण हात पुढे केला आहे.
“हिंदी-चीनी भाई भाई” या जुन्या घोषणेचा आधार घेत चीनने भारतीय नागरिकांना मोठ्या प्रमाणावर व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. १ जानेवारी ते ९ एप्रिल २०२५ या कालावधीत, भारतातील चिनी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांनी तब्बल ८५,००० भारतीयांना व्हिसा जारी केले आहेत.
भारत आणि चीनमधील संबंध काही काळापासून तणावपूर्ण होते. मात्र, व्यापार व पर्यटन क्षेत्रात नव्या सुरुवातीसाठी चीनने भारतीयांसाठी दारे उघडली आहेत. यामुळे दोन्ही देशांमधील लोक-ते-लोक संबंधांना चालना मिळणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चीनचे भारतातील राजदूत झू फेईहोंग यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, भारतीय नागरिकांना चीनमध्ये स्वागत करण्याची उघडपणे घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की, “भारतामधील अनेक मित्रांनी चीनमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि आम्ही त्यांचे मन:पूर्वक स्वागत करतो.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : एरिया 51 मध्ये एलियन्सचे ‘चार्जिंग स्टेशन’ सापडले; एका माजी CIA एजंटनेही एलियन्सना भेटल्याचा केला होता दावा
चीन सरकारने भारतीय नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रियेत अनेक महत्त्वाच्या सवलती जाहीर केल्या आहेत.
1. ऑनलाइन अपॉइंटमेंट आता अनिवार्य नाही – चीन व्हिसासाठी अर्ज करताना भारतीय नागरिकांना आता ऑनलाइन अपॉइंटमेंट बंधनकारक राहणार नाही.
2. लघुकालीन प्रवासासाठी बायोमेट्रिक माहितीची गरज नाही – जर भारतीय नागरिक कमी कालावधीसाठी चीनला प्रवास करत असतील, तर त्यांना बायोमेट्रिक डेटा (फिंगरप्रिंट्स) सादर करण्याची गरज नसेल.
3. व्हिसा प्रक्रिया अधिक सुलभ – ही सुधारणा केल्यामुळे भारतीय पर्यटकांना चीनमध्ये प्रवास करण्यासाठीचा मार्ग अधिक सोपा आणि सुकर झाला आहे.
अमेरिकेच्या वाढत्या संरक्षणवादाच्या पार्श्वभूमीवर, चीनला व्यापारसहकार्याच्या नवीन वाटा शोधाव्या लागतात. ट्रम्प यांच्या धोरणामुळे अनेक अमेरिकन कंपन्या आणि व्यापारी चीनवरून माघार घेत आहेत. अशा परिस्थितीत, भारतीय बाजारपेठ आणि भारतीय पर्यटकांचे महत्त्व अधिक वाढले आहे. भारताशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून चीन आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली प्रतिमा सुधारणाचा प्रयत्न करत आहे. हे केवळ एक पर्यटन धोरण नसून एक रणनीतिक हालचाल असल्याचे परराष्ट्र धोरण तज्ज्ञांचे मत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘ब्लू ओरिजिन’ मोहिमेचा ऐतिहासिक यशस्वी प्रवास पूर्ण; जेफ बेझोसचा भावी पत्नी परतल्यावरचा ‘हा’ VIDEO VIRAL
चीनच्या या कृतीमुळे 1950-60 च्या दशकातील ‘हिंदी-चीनी भाई भाई’ ची आठवण ताजी झाली आहे. तेव्हा भारत आणि चीन यांच्यातील मैत्रीचा सुवर्णकाळ अनुभवला गेला होता. आजच्या डिजिटल युगात, पर्यटन, शिक्षण, आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून नव्या सहकार्याची सुरुवात होऊ शकते. चीनकडून ज्या प्रकारे व्हिसा आणि इतर सवलती दिल्या जात आहेत, त्या भारत-चीन संबंधांना सकारात्मक वळण देऊ शकतात. अमेरिकेच्या व्यापारयुद्धात अडकलेला चीन आता भारताला मित्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे. ८५,००० हून अधिक भारतीय नागरिकांना व्हिसा देऊन चीनने मैत्रीचा ठोस सल्ला दिला आहे. आगामी काळात या पावलामुळे भारत-चीन संबंधांमध्ये नव्या सहकार्याचा अध्याय सुरू होईल की फक्त मुत्सद्दी खेळी ठरेल, हे वेळच सांगेल. मात्र, सध्या तरी चीनचा संदेश स्पष्ट आहे, “भारत, तू आमचा मित्र आहेस!”