‘ब्लू ओरिजिन’ मोहिमेचा ऐतिहासिक यशस्वी प्रवास पूर्ण; जेफ बेझोसचा पत्नी परतल्यावरचा भावुक VIDEO VIRAL ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Blue Origin Mission : अमेरिकी अब्जाधीश जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन या खाजगी अंतराळ संशोधन संस्थेने एक नवा इतिहास रचला आहे. १४ एप्रिल २०२५ रोजी ‘मिशन NS-31’ अंतर्गत सर्व महिलांचा अंतराळ प्रवास यशस्वीरीत्या पार पडला. या मोहिमेचा भाग म्हणून बेझोसची Fiancé लॉरेन सांचेझ, पॉप गायिका केटी पेरी, टीव्ही प्रेझेंटर गेल किंग, मानवाधिकार कार्यकर्त्या अमांडा गुयेन, चित्रपट निर्मात्या कॅरिन फ्लिन आणि नासाच्या माजी रॉकेट शास्त्रज्ञ आयशा बोवे यांनी अवकाशाची सफर केली. या अद्वितीय मोहिमेमुळे १९६३ मध्ये सोव्हिएत अंतराळवीर व्हॅलेंटिना तेरेशकोवा यांच्या ऐतिहासिक उड्डाणानंतर प्रथमच महिलांचा स्वतंत्र अंतराळ प्रवास झाला, हे विशेषत्वाने अधोरेखित होते.
‘ब्लू ओरिजिन’चे रॉकेट टेक्सासमधील व्हॅन हॉर्न लाँच पॅडवरून संध्याकाळी ७ वाजता प्रक्षेपित करण्यात आले. अवघ्या ११ मिनिटांच्या मोहिमेनंतर कॅप्सूल पुन्हा पृथ्वीवर परत आली. या अल्पावधीत रॉकेटने दोन्ही बाजूंनी मिळून २१२ किमीचे अंतर पार केले. रॉकेटच्या यशस्वी लँडिंगनंतर, जेफ बेझोसने आपल्या मंगेतराला मिठी मारत भावनिक स्वागत केले. तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल झाला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ब्लू ओरिजिनचं ऑल वुमन मिशन यशस्वी; हॉलीवूड गायिका केटीपेरीसह सहा महिलांनी घेतली अंतराळात झेप
This is one of the worst things I’ve seen.
Jeff Bezos is such a dork, and this entire thing is so cringe.
— Petey B (@realpeteyb123) April 14, 2025
credit : social media
या अवकाश प्रवासादरम्यान, केटी पेरीने लुई आर्मस्ट्राँगचे अजरामर गाणे ‘What a Wonderful World’ गात अंतराळात संगीतमय वातावरण निर्माण केले. अवकाशातील निःशब्दतेत हे सूर भावनांना स्पर्श करणारे ठरले. पृथ्वीवर परतल्यानंतर केटी पेरी इतकी भावूक झाली की तिने पृथ्वीला चुंबन देत आपल्या भावना व्यक्त केल्या. केटी पेरीने सांगितले की, ती या अनुभवावर आधारित एक गाणे लिहिणार आहे, जे भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी प्रेरणादायी ठरेल.
या मोहिमेत आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे लॉरेन सांचेझने एक खास उपकरण अंतराळात घेऊन जाणे. हे उपकरण ‘Teachers in Space’ या अमेरिकन एनजीओने तयार केले आहे. ते अंतराळातील आवाज, तापमान आणि दाब मोजण्याचे कार्य करत होते. लॉरेन यांनी स्पष्ट केले की, या उपकरणातून मिळालेली माहिती शालेय विद्यार्थ्यांना अंतराळ अनुभव अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करेल.
या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व सहा महिला विविध क्षेत्रातील दिग्गज होत्या. त्यांचा अनुभव, कर्तृत्व आणि आत्मविश्वास हे अवकाशातही झळकले. मानवाधिकार कार्यकर्त्या पासून चित्रपट निर्मात्यांपर्यंत, टीव्ही अँकर पासून वैज्ञानिकांपर्यंत या मोहिमेने महिलांच्या सामर्थ्याला नवे उंची दिले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘बांगलादेश सरकार पाहत राहिले…’ शेख हसीना यांच्या ‘लढाऊंनी’ केला युनूसच्या घरावर हल्ला
ब्लू ओरिजिनची ही मोहिम केवळ एक अंतराळ प्रवास नव्हता, तर तो माणुसकी, विज्ञान, कलेचा संगम आणि भविष्यासाठी प्रेरणा देणारा क्षण होता. केटी पेरीचे गाणे, लॉरेनचे शिक्षणात्मक उपकरण आणि सहा महिलांचा अद्वितीय अनुभव हे सर्व काही नव्या पिढीला ‘आकाश मर्यादा नसते’ हे शिकवणारे ठरले. ही मोहिम सिद्ध करते की अंतराळ आता केवळ वैज्ञानिकांसाठी नाही, तर सर्व क्षेत्रांतील जिज्ञासूंना उघडलेले एक स्वप्नवत दार आहे.