Chocolate Day 2025: कधीपासून हा दिवस साजरा केला जाऊ लागला? चॉकलेट डेचा गोड इतिहास जाणून घ्या
व्हॅलेंटाइन वीकला आता सुरुवात झाली आहे. हा प्रेमाच्या आठवडा जोडप्यांसाठी फार खास मानला जातो. या आठवड्याभरात कपल्स आपले प्रेम व्यक्त करू शकतात किंवा आपल्या प्रेमाची कबुली देऊ शकतात. व्हॅलेंटाईन वीकच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे साजरा केला जातो. या दिवशी जोडपे एकमेकांना त्यांचे आवडते चॉकलेट देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करतात. हा दिवस फक्त चॉकलेट्स देण्याचा नाही तर नात्यात गोडवा वाढवण्याचाही आहे. चॉकलेट हे नेहमीच प्रेमाचे प्रतीक मानले जाते. यामुळेच व्हॅलेंटाइन वीकमध्ये याला विशेष स्थान देण्यात आले आहे. पण व्हॅलेंटाइन वीकमध्ये चॉकलेट डे साजरा करण्याची परंपरा कशी सुरू झाली आणि हा दिवस ते कधीपासून सुरू झाला तुम्हाला माहिती आहे का? आज आपण या लेखात चॉकलेट डेचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत.
Chocolate Day 2025: हटके अन् युनिक चॉकलेट गिफ्ट आयडियाज, पाहता क्षणी क्रश तुमच्या प्रेमात पडेल
चॉकलेट डेचा इतिहास
असे मानले जाते की जेव्हा 16 व्या शतकात चॉकलेट युरोपमध्ये लोकप्रिय झाले, तेव्हा ते प्रेमाशी जोडले जाऊ लागले. यानंतर, चॉकलेट हळूहळू प्रेम आणि विशेष प्रसंगांच्या अभिव्यक्तीचा एक भाग बनले. व्हॅलेंटाईन वीकमध्ये हे जोडण्याचा उद्देश नात्यात गोडवा आणणे आणि प्रेम वाढवणे हा होता.
चॉकलेट चव गोड नसायची…
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सुरुवातीला जे चॉकलेट तयार करण्यात आले ते गोड नसून मसालेदार चवीचे होते. चॉकलेटचा इतिहास सुमारे 4 हजार वर्षांचा आहे. मेक्सिकोमध्ये याचा शोध लागला. प्रथमच, कोकोच्या बिया बारीक करून आणि मसाले आणि मिरची घालून मसालेदार चॉकलेट बनवले जाते. यानंतर, चॉकलेट स्पेनमध्ये आणि नंतर जगभरात प्रसिद्ध झाले.
का साजरा केला जातो चॉकलेट डे
चॉकलेटची गोड चव देखील मैत्रीतील गोडपणाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की चॉकलेट डे नातेसंबंधांमधील गैरसमज दूर करण्याची संधी प्रदान करतो. ते खाल्ल्याने सेरोटोनिन आणि डोपामाइन नावाचे आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे मूड तणावमुक्त होण्यास मदत होते.
कसा साजरा केला जातो चॉकलेट डे
चॉकलेट डे निमित्त अनेक लोक आपल्या जोडीदाराला सुंदर आणि अनोखे चॉकलेट देऊन हा दिवस साजरा करतात. तसेच काहीजण यानिमित्त चॉकलेटपासून तयार केलेले पदार्थही गिफ्ट करतात. यात चॉकलेट केक, चॉकलेट कुकीज, चॉकलेट हॅम्पर अशा गोष्टींचा समावेश आहे