Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयुष्यभर नात्यामधील प्रेम आणि आदर जपण्यासाठी जोडीदाराला पाठवा Valentine’s Day च्या प्रेमळ शुभेच्छा

नवरा बायको किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या नात्यातील गोडवा आणि प्रेम वाढवण्यासाठी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला रोमँटिक शुभेच्छा पाठवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 14, 2026 | 05:30 AM
आयुष्यभर नात्यामधील प्रेम आणि आदर जपण्यासाठी जोडीदाराला पाठवा Valentine's Day च्या प्रेमळ शुभेच्छा

आयुष्यभर नात्यामधील प्रेम आणि आदर जपण्यासाठी जोडीदाराला पाठवा Valentine's Day च्या प्रेमळ शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

संपूर्ण जगभरात १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक जोडप्यासाठी अतिशय खास आणि आनंदाचा दिवस आहे. आवडत्या व्यक्तीला, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, नवरा – बायको यांच्या नात्यातील प्रेम वाढवण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात वेगवेगळे डे साजरा केले जातात. तसेच जवळच्या व्यक्तीला भेटवस्तू सुद्धा दिली जाते. त्यामुळे यंदाच्या व्हॅलेंटाईन डे तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला मराठमोळ्या रोमँटिक शुभेच्छा देऊन हा दिवस आणखीनच स्पेशल बनवू शकता. व्हॅलेंटाईन डे ची सुरुवात आंनदाने होण्यासाठी पाठवा या शुभेच्छा.(फोटो सौजन्य – istock)

Hug Day 2026: एका मिठीत व्यक्त करा सगळं प्रेम….! हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोका माझे तुझ्यावरील प्रेम अधिक उत्कटतेने वाढवतो. तू माझं कायमचं प्रेम आहेस. व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा, माझी सर्वात सुंदर माऊ!

तुझ्यावर प्रेम करणे हे रोलरकोस्टरवर स्वार होण्यासारखे आहे, अत्यंत रोमांचक, पुढे काय आहे हे कधीही न कळण्यासारखे. पण मला ते प्रचंड आवडतं आणि मला आयुष्य तुझ्याबरोबर असंच जगायचं आहे, माझी होशील का?

माझ्या हृदयात वाजणारा स्वर तूच आहेस, आयुष्यभर मला हा एकच राग आळवायचा आहे. तुझ्यासोबत सूर जुळवत जगायचे आहे, व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा!

तुझ्याबरोबर, प्रत्येक क्षणाला असे वाटते की आपण आपल्या प्रेमाने आकाश रंगवत आहोत, अत्यंत गडदपणे, तेजस्वी आणि सुंदरपणे हे प्रेम रेखाटत आहोत. तू माझी सर्वात आवडती आणि सुंदर कलाकृती आहेस, जिला आयुष्यभर जपायचे आहे. व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा.

तुझ्या प्रेमाचा रंग तो अजूनही बहरत आहे
शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त आणि फक्त तुझीच आहे
हॅपी व्हॅलेंटाईन डे

ज्याच्याजवळ माझ्या हृदयाची किल्ली आहे
ज्याचं प्रेम माझं मार्गदर्शक आहे
त्या माझ्या सर्वस्व असणाऱ्याला
व्हॅलेंटाईन डे च्या मनःपूर्वक शुभेच्छा

एकटाच चालतो आहे आजवरी,
हात हाती घेशील का?
घेईन उंच भरारी तुजसवे
साथ मज देशील का?
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

डोळ्यातल्या स्वप्नाला
कधी प्रत्यक्षातही आण,
किती प्रेम करतो तुझ्यावर
हे न सांगताही जाण
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

बंध जुळले असता,
मनाचं नातंही जुळायला हवं
अगदी स्पर्शातूनही
सारं सारं कळायला हवं
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

तुला माझ्या आठवणीत,
हसताना पाहायचंय
जीवनाचं सुंदर स्वप्न मला,
आता तुझ्याचसोबत जगायचंय..
व्हॅलेंटाईन डे च्या मनःपूर्वक शुभेच्छा

तुझे माझे नाते असे असावे
जे शब्दांच्या पलीकडे एकमेकांस उमगावे
कितीही एकमेकांपासून दूर असलो तरी
मनाने कायम एकमेकांच्या जवळ असावे
व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा

स्पर्शांना अर्थ मिळाले
नात्यांना आली गोडी
माझ्यातून ‘मी’ कातरला
अन् सुटली सारी कोडी
व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा

न सांगताच तू , मला उमगते सारे
कळतात तुलाही, मौनातील इशारे
दोघात कशाला मग, शब्दांचे बांध
कळण्याचा चाले कळण्याची संवाद
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे

सहवासात तुझ्या,
व्याख्या मैत्रिची छान समजली
सांगती तू असता,
जगण्याची रीत जणू मज उमजली
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे

काळोखाच्या वाटेवर चालताना, हातामध्ये तुझाच हात
धडपडत्या आयुष्याला सावरताना, आता फक्त तुझीच साथ
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

Valentine’s Day 2026: बॉयफ्रेंडला काय गिफ्ट करावं ते सुचत नाहये? मग ‘हे’ भन्नाट गिफ्ट आयडियाज येतील कामी

ना कसले बंध, ना कसली वचने
मैत्री म्हणजे खरंतर, मनाने जवळ असणे
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं
तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

Web Title: Send loving valentines day wishes to your partner to cherish the love and respect in the relationship for a lifetime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • LIFESTYLE
  • Valentine Day
  • valentine day tips

संबंधित बातम्या

Mangalagaur 2026: मंगळागौरीच्या कार्यक्रमांची उखाण्यांनी वाढवा रंगत! विवाहित महिलांसाठी मजेशीर उखाणे
1

Mangalagaur 2026: मंगळागौरीच्या कार्यक्रमांची उखाण्यांनी वाढवा रंगत! विवाहित महिलांसाठी मजेशीर उखाणे

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
2

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
3

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

सुंदर दिसणारी ही झाडे सापांना करतात आकर्षित, घराभोवती लावण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4

सुंदर दिसणारी ही झाडे सापांना करतात आकर्षित, घराभोवती लावण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.