Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…म्हणून शहर काँग्रेसचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखांना साकडे

नगर शहराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ती उभी राहिली आहेत. नगरसाठी शासकीय महाविद्यालयासह संलग्नित सुसज्ज रुग्णालय मंजूर करण्याची मागणी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे करत शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी साकडे घातले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 24, 2022 | 05:37 PM
…म्हणून शहर काँग्रेसचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखांना साकडे
Follow Us
Close
Follow Us:

अहमदनगर : नगर शहराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ती उभी राहिली आहेत. नगरसाठी शासकीय महाविद्यालयासह संलग्नित सुसज्ज रुग्णालय मंजूर करण्याची मागणी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे करत शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी साकडे घातले आहे.

देशमुख यांनी यासाठी सर्व निकषांची पूर्तता झाल्यानंतर मान्यता दिली जाईल, असे आश्वासन दिले असल्याचे काळे यांनी सांगितले आहे. गुरुवारी सकाळी मुंबईत देशमुख यांच्या शासकीय निवासस्थानी काळे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, सांस्कृतिक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील आदी त्यांच्या समवेत उपस्थित होते.

अहमदनगर महानगरपालिकेचे स्वतःचे हॉस्पिटल नसल्यामुळे कोरोना महामारी काळात नगरकरांचे अतोनात हाल झाले आहेत. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास या शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा नगरकरांना उपयोग होऊ शकतो, असे म्हणत नगरकरांची ही प्रलंबित मागणी मान्य कराच असा आग्रह यावेळी देशमुख यांच्याकडे काळे यांनी धरला.

याबाबत अधिक माहिती देताना किरण काळे म्हणाले की, देशमुख यांच्या सूचनेवरून चार तज्ञ प्राध्यापकांच्या समितीने नगरला प्रत्यक्ष भेट देऊन जानेवारी महिन्यातच या संदर्भातला प्राथमिक अहवाल संचलनालयाने सादर केलेला आहे. यामध्ये १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय मान्यतेसाठी सादर करण्याची कार्यवाही संचलनालयात सुरु असल्याची माहिती कालच मंत्रीमहोदयांनी विधिमंडळात प्रश्नोत्तराच्या तासात दिली आहे.

महाविकास आघाडीच्या तीन पक्षांच्या सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण खाते हे आमच्या काँग्रेस पक्षाकडे आहे. शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही आमच्या पक्षाचे नेते आणि या खात्याचे मंत्री देशमुख यांच्याकडे नगरकरांसाठी या प्रस्तावाला मान्यता देण्याबाबत मागणी केली असून आग्रह धरला आहे. अमित देशमुख यांनी यासाठी सर्व निकषांची पूर्तता झाल्यानंतर मान्यता दिली जाईल, असे आश्वासन दिले असल्याचे काळे यांनी सांगितले आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे देखील किरण काळे यांनी ही मागणी केली असून थोरात, पटोले या दोघांनीही देशमुख यांच्याशी यावर चर्चा करून नगरसाठी ही मान्यता मिळवून दिली जाईल, असे आश्वासन दिले असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

Web Title: City congress office bearers meets minster amit deshmukh for hospital formation nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2022 | 05:37 PM

Topics:  

  • Amit Deshmukh

संबंधित बातम्या

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक
1

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक
2

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने काँग्रेस पक्षात केला प्रवेश
3

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने काँग्रेस पक्षात केला प्रवेश

Latur rada News : लातूरमध्ये Congress-BJP कार्यकर्त्यांमध्ये राडा
4

Latur rada News : लातूरमध्ये Congress-BJP कार्यकर्त्यांमध्ये राडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.