लातूर शहरात मागील तीन महिन्यापूर्वी प्रभाग क्रमांक 16 येथील एका खड्ड्यांमध्ये दोन बालकाचा खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक गिरीश पाटील नगरसेविका राजश्री धोत्रे प्रभागातील नागरिकांनी…
लातूर शहर व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आष्टामोड परिसरात औद्योगिक वसाहत आणि स्वतंत्र ऑटो इंडस्ट्री उभारण्याच्या मागणीला अखेर गती मिळाली असून भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांनी मिळवलेल्या यशानंतर राज्याचे माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विकास कामे दिलेल्या वेळेत पूर्ण करून घेण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने दणदणीत यश संपादन करत जिल्ह्यात पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विलासराव देशमुख यांच्या विचारांना मतदारांनी पाठिंबा दिला.
लातूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर काल सकाळी काँग्रेसच्या नवनिर्वाचित महापौर जयश्रीताई सोनकांबळे आणि नूतन उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे यांनी आपापल्या पदांचा अधिकृत पदभार स्वीकारला.
सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे सत्ताधारी भाजप व मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचे धोरण असून निवडणुकीच्या काळात मतांचा बाजार मांडणाऱ्यांना जनता धडा शिकवेल असा विश्वास आ. अमित देशमुख यांनी व्यक्त…
विलासराव देशमुख यांच्या अडचणी 100 टक्के पुसल्या जाणार असे वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केले. यावरुन विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख आणि अमित देशमुख यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कॉंग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत एक वक्तव्य केले होते. यावरुन टीका झाल्यानंतर चव्हाण वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
लातूर जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि एक नगरपंचायत निवडणुकीत आघाडीमध्ये सुद्धा बिघाडी झालेली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा, उदगीर आणि रेनापुर येथे काँग्रेस स्वबळावर लढत आहे. तर अहमदपूर आणि औसा येथे महाविकास…
सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला राज्यातील शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होतोय, मात्र सरकारकडून शेतकऱ्यांना जबरदस्तीने नोटीसा दिल्या जात आहेत
पंढरपूरच्या लाडक्या विठूरायाचं दर्शन सर्व वारकऱ्यांना व्हावं यासाठी दरवर्षी लातुरातील श्री सत्संग प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांना मोफत एसटी सेवा उपलब्ध करून दिली जाते.
काही दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावसामुळे लातूर शहरात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा लातूर शहरचे आमदार अमित देशमुख यांनी आज लातूर महापालिकेत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.