नागपूर (Nagpur). अंगात संचारलेला कथित नागोबा आणि मंत्रशक्तीच्या बळावर कोरोना पूर्णपणे बरा करण्याचा दावा करणाऱ्या नागोबा बाबाला पोलिसांनी सापळा रचून अटक (arrested Nagoba Baba) केली. ३२ वर्षीय शुभम तायडे असे या भोंदूबाबाचे नाव आहे. बाबांकडून दुर्धर आजार (the chronic illness) कथित मंत्रशक्तीच्या आधारे (basis of alleged mantras) बरे केले जात असल्याचा तक्रारी अंधश्रद्धा निर्मूलन (the Anti Superstition Committee) समितीस प्राप्त झाल्या होत्या. या आधारे समितीच्या कार्यकत्र्यांनी बाबांकडे जाऊन त्याची पुष्टी केली. यानंतर पोलिसांच्या मदतीने बाबांना बेड्या ठोकण्यात आल्या.
नागपुरातील पंचशील नगरात या बाबाने दरबार भरवून भोळ्याभाबड्या भक्तांना लुबाडणे सुरू केले होते. या दरम्यान त्याने आजार बरा करण्याचा दावा करत एका महिलेला लुबाडले. अखेर त्या महिलेने पोलिसात तक्रार करून बाबाचे पितळ उघडले पाडले.
आरोपी शुभम तायडे हा भोंदू बाबा कोरोनाच्या उपचार व्यतिरिक्त पैशांचा पाऊस पाडणे, कौटुंबिक कलह दूर करणे, गुप्तधन शोधून देणे या नावावर देखील सामन्यांची फसवणूक करत होता. पेशाने प्लंबरचे काम करणारा हा भोंदूबाबा मागच्या दोन वर्षांपासून भोंदूगिरी करत होता. पोलिसांनी त्याला अटक केल्या नंतर त्याच्या भक्तांनी त्याला सोडण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. सद्या तो पोलिसांच्या कोठडीत असून या भोंदूबाबवर कडक कारवाई करावी अशी मागणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
शुभम तायडे याच्या अंगात नाग संचारला की हा कोरोना बरा होतो असा त्याचा दावा आहे. त्यासाठी तो मंत्रतंत्राचा वापर करायचा.. नागोबा बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भोंदू बाबाचा दर गुरुवारला नागपूरच्या पंचशील नगरमध्ये दरबार भरायचा. त्याच्याकडे मोठ्या संख्येने रुग्ण देखील जायचे. मात्र याने एका महिलेची फसवणूक केल्यानंतर हा प्रकार अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या कानावर आला त्यांनतर त्यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी सापळा रचून या भोंदू बाबाला अटक केली आहे.
कोरोनावर लस उपलब्ध झाली आहे आणि त्यासोबतच इतरही औषधांवर जगात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असतांना अनेक रुग्ण विज्ञानाकडे वळण्यापेक्षा नागोबा बाबा सारख्या भोंदूच्या जाळ्यात अडकतात. यानंतर स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात टाकतात. आजच्या काळातही असे घडत असल्याने नागरिकांमध्ये जागरूकता पसरवणे आवश्यक आहे.