Congress state president Nana Patole's complaint against his own minister; Letter to Chief Minister Uddhav Thackeray
नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वपक्षीय मंत्र्यांविरोधात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रातून पटोले यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर गैरकारभाराचे गंभीर आरोप केले आहे.
पटोले यांनी पत्रात महाजेनको, म्हणजेच राज्याच्या वीजनिर्मिती कंपनीमध्ये कोळसा पुरवठा आणि कोळसा वॉशिंगच्या निविदा प्रक्रियेत घोळ, गैरमार्गाचा वापर आणि अनधिकृतपणे पदाचा वापर करून काम दिल्याचा ठपका ठेवला आहे. महाजेनकोने दिलेल्या या कामाच्या अंतिम आदेशाला स्थगिती द्यावी आणि सखोल चौकशी करावी, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे. कोळसा पुरवठा आणि वॉशिंगचे काम हे रुखमाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेडला देण्यात आले आहे.
कंपनीचे कुठलेही नेटवर्थ नाही. कंपनीचा टर्नओव्हर नाही. कंपनीला सेक्युरिटी क्लियरन्स नाही. कंपनीला कोळसा वॉशिंगचा कुठलाही अनुभव नाही. कंपनीने ज्या कंपनीसह जेव्ही केले आहे. ती कंपनी काळ्या यादीत आहे. अटी, शर्ती पूर्ण केल्या नसताना गैरमार्गाने कामासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. महाजेनकोला हे वेळेवर कोळसा पुरवठा करू शकणार नाही. याचा परिणाम महाजेनकोच्या वीज उत्पादनावर होणार आहे.
पत्रात रुखमाई इन्फ्रा ही कंपनी संजय हरदवाणीची असल्याचे नानांनी नमूद केले आहे. पटोले यांनी हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या व्यतिरिक्त शासनाच्या काही संबंधित सचिव, खनिज महामंडळाचे चेयरमन इत्यादींना लिहिले आहे. पण त्यांनी ज्या खात्यासाठी ही सर्व निविदा प्रक्रिया घेण्यात आली आहे, त्या ऊर्जा खात्याच्या मंत्र्यांना, म्हणजेच त्यांच्याच पक्षाचे मंत्री नितीन राऊत यांना मात्र या पत्राची कॉपी नाही. राऊत ह्यांच्या खात्यासाठीच या निविदा काढण्यात आल्या असून कामाचे कंत्राट संजय हरदवाणीला देण्यात आले आहे. हरदवाणी हे ऊर्जामंत्री राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे महाजेनको आणि हरदवाणी यांच्या माध्यमातून पटोले यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
[read_also content=”जन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आई-वडिल भयंकर घाबरले आणि… https://www.navarashtra.com/latest-news/gave-birth-to-an-upturned-girl-the-parents-were-terrified-when-they-saw-the-baby-and-nrvk-146438.html”]
[read_also content=”जीवघेण्या व्हायरसने झोप उडवली https://www.navarashtra.com/latest-news/panic-of-corona-virus-delta-spread-rapidly-in-8-states-including-maharashtra-nrvk-146421.html”]
[read_also content=”प्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम https://www.navarashtra.com/latest-news/vanilla-ice-cream-will-be-made-from-plastic-waste-nrvk-146253.html”]
[read_also content=”तब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप https://www.navarashtra.com/latest-news/the-couple-had-been-tying-each-others-hands-for-123-days-now-they-had-a-breakup-nrvk-145996.html”]
[read_also content=”नाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका https://www.navarashtra.com/latest-news/night-shifts-can-be-dangerous-risk-of-diseases-such-as-heart-disease-brain-disease-and-cancer-nrvk-145999.html”]
[read_also content=”एकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या https://www.navarashtra.com/latest-news/mansukh-hiren-murder-case-sunil-mane-remanded-in-nia-custody-till-june-25-pradeep-sharma-is-allowed-to-meet-lawyers-every-day-nrvk-145535.html”]
[read_also content=”‘माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट’; एनआयएसमोर महिला हजर https://www.navarashtra.com/latest-news/my-husband-pradip-sharmas-collection-agent-women-present-before-nis-nrvk-145557.html”]
[read_also content=”सकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे? तुमचा दिवस शुभ जाईल https://www.navarashtra.com/latest-news/what-to-see-when-you-wake-up-in-the-morning-have-a-good-day-nrvk-145114.html”]