Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘यू.पी.’च्या दहशतवाद विरोधी पथकाची नागपुरात कारवाई; तिघांना अटक

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) दहशतवाद विरोधी पथकाने (Anti Terrorism Squad) शुक्रवारी मध्यरात्री नागपुरातील गणेशपेठ परिसरात (Ganeshpeth area) छापा टाकून तीन जणांना अटक केली.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 17, 2021 | 03:26 PM
‘यू.पी.’च्या दहशतवाद विरोधी पथकाची नागपुरात कारवाई; तिघांना अटक
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur). उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) दहशतवाद विरोधी पथकाने (Anti Terrorism Squad) शुक्रवारी मध्यरात्री नाग[blurb content=””]पुरातील गणेशपेठ परिसरात (Ganeshpeth area) छापा टाकून तीन जणांना अटक केली. प्रसाद रामेश्वर कांबळे, कौसर आलम शोकत अली खान व भूप्रियबंडो देवीदास मानकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. एक महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने धर्मांतर रॅकेट (conversion racket) उघडकीस आणले होते. त्याप्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,एटीएसने अटक केलेला प्रसाद हा गणेशपेठेतील राहुल कॉम्पलेक्समध्ये राहतो. तर, कौसर आलम हा झारखंडमधील धनबादमधील लोहिचारा येथील रहिवासी आहे. मानकार हा गडचिरोलीतील चामोर्शीतील वायगाव येथे राहतो. एक महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने धर्मांतर करणारे रॅकेट उघडकीस आणले होते. याप्रकरणात गोमतीनगर पोलिस स्टेशनमध्ये धर्मांतर विरोधी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. एसटीएसने यावेळी अटकेतील आरोपींकडून एक डायरीही जप्त केली होती. यात महाराष्ट्र, केरळ, हरयाणा, आधंप्रदेश व दिल्लीतील रॅकेटच्या सदस्यांची नावे होती. तेही या कटात सहभागी झाल्याचे त्यावेळी निष्पन्न झाले होते.

कांबळे हा दोन साथीदारांसह नागपुरातील घरी दडून बसल्याची माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली. शुक्रवारी मध्यरात्री एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने राहुल कॉम्प्लेक्समधील फ्लॅट क्रमांक २०२ मध्ये छापा टाकला. एटीएसच्या पथकाने प्रसाद, कौसर व मानकरला अटक केली. मध्यरात्रीच एटीएसचे पथक तिघांना घेऊन लखनऊकडे रवाना झाले.

दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) धर्मांतराच्या या प्रकरणाचा शोध घेतला होता. त्याचा मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) तपास करण्यासाठी ईडीने गेल्या महिन्यांत फौजदारी गुन्हा दाखल केला होता. ‘एटीएस’ने याप्रकरणी दिल्लीतील जमिया नगरमधील दोन रहिवाशांना अटक केली होती.

मुफ्ती काझी जहांगिर अलम ओएस्मी आणि मोहम्मद उमर गौतम अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे ‘इस्लामिक दवाह सेंटर’ नावाची संघटना चालवत होते. त्यांना पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ व अन्य परदेशी संस्थांकडून बेकायदा कृत्यांसाठी पैसे पुरवले जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) तपास करण्यासाठी ईडीने गेल्या महिन्यात फौजदारी गुन्हा दाखल केला होता.

Web Title: Conversion racket case ups anti terrorism squad takes action in nagpur three arrested nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2021 | 03:26 PM

Topics:  

  • Anti-Terrorism Squad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.