Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: मोबाईल-रील्सच्या आहारी जाण्याचा धक्कादायक परिणाम; इंटरनेट बंद पडल्याने महिलेने घेतला टोकाचा निर्णय

मोबाईलवर रील्स पाहण्यात मग्न असताना इंटरनेट वारंवार बंद होत असल्याने महिलेचा संताप अनावर झाला. त्या रागातून मोबाईल फोडल्याने काही वेळातच घडलेल्या घटनेने कुटुंबीयांना धक्का बसला; आणि महीलेचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 08, 2026 | 03:41 PM
Crime News: मोबाईल-रील्सच्या आहारी जाण्याचा धक्कादायक परिणाम; इंटरनेट बंद पडल्याने महिलेने घेतला टोकाचा निर्णय

Crime News: मोबाईल-रील्सच्या आहारी जाण्याचा धक्कादायक परिणाम; इंटरनेट बंद पडल्याने महिलेने घेतला टोकाचा निर्णय

Follow Us
Follow Us:
  • इंटरनेट खंडित झाल्याने संताप अनावर
  • रागाच्या भरात महीलेने फोडला मोबाईल
  • महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात समोर
छत्तीसगड: मोबाईलवर रील्स पाहण्याच्या सवयीचे वाढते व्यसन आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर अवलंबित्व किती गंभीर परिणाम घडवू शकते, याची धक्कादायक घटना छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात समोर आली आहे. इंटरनेट वारंवार खंडित होत असल्याने संतप्त झालेल्या ५२ वर्षीय महिलेने टोकाचे पाऊल उचलले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मंगलो बाई सारथी असे मृत महिलेचे नाव असून त्या करतला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील केराकाछार गावातील रहिवासी होत्या.

रिल्समुळे मोठा घात

मिळालेल्या माहितीनुसार, मंगलो बाई यांना मोबाईलवर रील्स पाहण्याची मोठी सवय होती. शनिवारी त्या मोबाईलवर रील्स पाहत असताना इंटरनेट नेटवर्कमध्ये वारंवार अडथळे येत होते. त्यामुळे व्हिडिओ पाहण्यात व्यत्यय येत असल्याने त्या संतप्त झाल्या. रागाच्या भरात त्यांनी मोबाईल फोडल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली. ही बाब त्यांच्या १७ वर्षीय मुलीच्या लक्षात आली. मुलीने तातडीने कुटुंबातील इतर सदस्यांना याची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी मंगलो बाई यांना उपचारासाठी करतला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

उपचारादरम्यान मृत्यू

प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी कोरबा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. तेथे डॉक्टरांनी उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

सोशल मीडिया वापराच्या वाढत्या व्यसनाचा प्रश्न चर्चेत

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर  पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे. कुटुंबीयांचे जबाब आणि घटनेच्या पार्श्वभूमीची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. महिलेने टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या मानसिक स्थितीत उचलले, याचाही तपास केला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे मोबाईल आणि सोशल मीडिया वापराच्या वाढत्या व्यसनाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. रील्स पाहणे किंवा सोशल मीडिया वापरणे ही सवय दैनंदिन जीवनाचा मोठा भाग बनत असताना त्याचे अतिवापरात रूपांतर होऊ नये, याबाबत तज्ज्ञांकडून सातत्याने जनजागृती केली जाते.

विशेषतः इंटरनेट किंवा सोशल मीडिया उपलब्ध नसल्याने निर्माण होणारी अस्वस्थता, चिडचिड आणि तणाव याकडे दुर्लक्ष न करण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे. कोणत्याही व्यक्तीमध्ये अशा प्रकारची तीव्र अस्वस्थता किंवा स्वतःला इजा करण्याची भावना दिसल्यास कुटुंबीयांनी तातडीने मदत घेणे आवश्यक आहे.

Web Title: Crime news shocking consequence of mobile and reels addiction extreme step taken after internet outage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 03:41 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.