Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ओव्हरशूटिंग’मुळे झाला रेल्वे अपघात? मृतांचा आकडा 13 वर; 50 जखमी!

रेड्डी यांनी विझियानगरम जिल्ह्यातील कांतकप्पल्ली येथे झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 30, 2023 | 09:33 AM
‘ओव्हरशूटिंग’मुळे झाला रेल्वे अपघात? मृतांचा आकडा 13 वर; 50 जखमी!
Follow Us
Close
Follow Us:

आंध्र प्रदेशातील विझियानगरम जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी दोन गाड्यांमध्ये झालेल्या धडकेत (Andra Pradesh Train Accident) मृतांची संख्या १३ झाली आहे. तर 50 जण जखमी झाले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. रविवारी संध्याकाळी विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर (ट्रेन क्रमांक ०८५३२) आणि विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर (ट्रेन क्रमांक ०८५०४) एकमेकांवर आदळली. या घटनेत तीन डब्यांचे नुकसान झाले आहे.

[read_also content=”केरळ स्फोट प्रकरणी एका आरोपीने केलं आत्मसमर्पण, स्फोट करण्यामागचं कारणही सांगितलं! https://www.navarashtra.com/india/accused-surrendered-to-police-in-kerala-serial-blast-case-nrps-475440.html”]

विजियानगरमचे एसपी दीपिका यांनी सांगितले की, आंध्र प्रदेश रेल्वे अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी ७ जणांची ओळख पटली आहे, उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अपघातामागचं कारण काय?

हावडा-चेन्नई मार्गावरील विझियानगरम जिल्ह्यातील रेल्वे अपघात मानवी चुकांमुळे आणि सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यामुळे झाला असावा, असे पूर्व किनारपट्टी रेल्वेने रविवारी सांगितले.

ईस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ बिस्वजित साहू म्हणाले की, अपघाताचे संभाव्य कारण मानवी चूक आणि विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेनने सिग्नलचे ‘ओव्हरशूटिंग’ असू शकते. ओव्हरशूटिंगबद्दल, सीपीआरओ म्हणाले की जेव्हा एखादी ट्रेन लाल सिग्नलवर थांबण्याऐवजी पुढे जाते तेव्हा असे होते.

एनडीआरएफकडुन बचावकार्य सुरू

विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य जोरात सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) यांना माहिती देण्यात आली आणि मदतीची मागणी करण्यात आली आणि रुग्णवाहिका आणि आपत्ती निवारण गाड्या घटनास्थळी पोहोचल्या, असे अधिकाऱ्याने सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी बचाव कार्याचे दिले निर्देश

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले. जखमींना नेण्यासाठी पुरेशा प्रमाणात रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये 

रेड्डी यांनी विझियानगरम जिल्ह्यातील कांतकापल्ली येथे झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली. इतर राज्यातून जखमींना 50 हजार रुपये दिले जाणार आहेत.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघाताबाबत मुख्यमंत्र्यांना फोन केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले की, अपघातस्थळी बचाव पथके पाठवण्यात आली असून शिक्षणमंत्री बी. सत्यनारायण, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक मदत आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Death toll to andhra pradesh train accident is 13 accident caused by overshooting nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2023 | 09:33 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.