Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जालना जिल्ह्यात वृक्षवल्लींची संख्या वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविला अनोखा उपाय; प्रति व्यक्तीमागे तीन झाडे लावण्याचा आदेश

जालना जिल्ह्यात (Jalna District) वृक्ष लागवड (trees to be planted) मोठ्या प्रमाणावर व्हावी म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे (District Collector Ravindra Binwade) यांनी अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक व्यक्ती मागे तीन झाडे लावा (to plant three trees behind each person) , असे आदेशच रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 12, 2021 | 05:34 PM
जालना जिल्ह्यात वृक्षवल्लींची संख्या वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविला अनोखा उपाय; प्रति व्यक्तीमागे तीन झाडे लावण्याचा आदेश
Follow Us
Close
Follow Us:

जालना (Jalna).  जालना जिल्ह्यात (Jalna District) वृक्ष लागवड (trees to be planted) मोठ्या प्रमाणावर व्हावी म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे (District Collector Ravindra Binwade) यांनी अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक व्यक्ती मागे तीन झाडे लावा (to plant three trees behind each person) , असे आदेशच रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत. त्यामुळे जालन्यात हिरवाई बहरणार आहे. वृक्ष लागवड मोहिम राबविण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काल आढावा बैठकीचे आयेाजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे बोलत होते.

यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुडे, सहाय्यक वनसंरक्षक वन विभाग पी.पी. पवार, जिल्हा रेशीम विकास अधिकारी मोहिते, जिल्हा प्रशासन अधिकारी नगर विकास शाखा सुर्यवंशी, सहायक गट विकास अधिकारी सिरसाट, वरिष्ट सहाय्यक जाधव, कार्यक्रम व्यवस्थापक एस.आर. देवढे, रोटरी क्लॅब ऑफ जालना रेन्बोच्या अध्यक्षा स्मिता भक्कड, डॉ. हयातकर, पठाडे यांच्यासह रोटरी क्लॅब ऑफ जालना रेन्बो सदस्य अशासकीय संस्थेचे सदस्य आदी उपस्थित होते.

आराखडे तयार करा
05 जुन 2021 रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मोहीम स्वरुपात जालना जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालिका व शहरी भागात वृक्ष लागवड कार्याक्रमाचा शुभारंभ करण्यात यावा. रोपांच्या उपलब्धेबाबत वन विभाग व सामाजिक वनीकरण यांनी नियोजन करुन आवश्यकते प्रमाणे रोपे उपलब्ध करुन द्यावीत, असे निर्देश बिनवडे यांनी यावेळी दिले. वृक्ष लागवडीचे ग्रामपंचायतनिहाय सुक्ष्म नियोजन करून आराखडे तातडीने सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

मिळेल तिथे झाडे लावा
वृक्षलागवडीचे काम येत्या पावसळयात करावयाचे असल्यामुळे गावातील, शहरातील प्रत्येक व्यक्तीने उपलब्ध असलेल्या मोकळया जागेत, शेतामध्ये, बांधावर, पडीक जमिनीवर, रस्ता दुतर्फा, कॅनॉल दुतर्फा, नदी व नाले यांच्या काठावर वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेवून गावातील व शहरातील प्रत्येक व्यक्तीमागे किमान 3 झाडे लावण्याकरिता नियेाजनबध्द पध्दतीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

अब्दुल सत्तार जालन्यात
दरम्यान, राज्याचे महसुल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल जालन्यातील जिल्हा कोव्हीड रुग्णालयाला भेट देत कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची पहाणी केली. तसेच खासगी रुग्णालयाच्या बरोबरीची व्यवस्था असणारे हे रुग्णालय उभारण्यात आल्याने सत्तार यांनी समाधान व्यक्त करत कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा सर्व डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार या सर्व कोरोनायोद्धयांचे आभारही व्यक्त केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, माजी आमदार अर्जुनराव खोतकर, भास्कर आंबेकर, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, बाला परदेशी, मनिष श्रीवास्तव आदी उपस्थित होते.

Web Title: District collector suggests unique measures to increase the number of trees in jalna district order to plant three trees per person nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2021 | 05:34 PM

Topics:  

  • Jalna District

संबंधित बातम्या

चोरीला वैतागून वकिलाने चोरांना उद्देशून लिहिला पत्र, विनंती आणि वंदनही केलं
1

चोरीला वैतागून वकिलाने चोरांना उद्देशून लिहिला पत्र, विनंती आणि वंदनही केलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.