यवतमाळ : महागाव तालुक्यातील शिरपुल्ली येथील पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. शेतात जाण्यासाठी शिरपुल्ली येथील शेतकऱ्यांना रस्ता नसल्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
शेती कामासाठी लागणारे साहित्य नेण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच कसरत होत आहे. शिरपूल्ली ते डोंगरगाव हा रस्ता चिखलामुळे अतिशय खराब झालेला आहे. रस्त्याअभावी दहा ते पंधरा शेतकरी कुटूंबाने शेतातच राहुटी सुरू केली आहे. शेतकऱ्यांची अवस्था बघून तत्कालीन खासदार राजीव सातव यांनी या रस्त्यावरील नाल्यावर पुल उभारणीसाठी निधी दिला होता. माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. बी.एन चव्हाण यांनी एक किलोमीटर डांबरीकरण व खडीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यातून शिरपुल्लीपासुन एक किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण झाले. मात्र. उर्वरित रस्ता दोनवेळेस मंजुर झाला. या रस्त्यांचे दोन ठेकेदारांनी काम घेतले. कार्यरंभ आदेश निघून सहा महिने झाले. तरी दोन्ही ठेकेदारांनी काम केले नाही. त्यांच्याकडून काम करण्यास टाळाटाळ केली जात आहे. या रस्त्यावरून पायदळ चालणे देखील कठीण झाले आहे. या रस्त्याच्या त्रासाला कंटाळून १५ ते २० शेतकऱ्यांनी आता शेतातच घरे तयार करून राहणे पसंत केले आहे. शेतात जाणे – येणे करणे, शेता साहित्य नेणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा मार्ग अवलंबला आहे. शासनाने तात्काळ दखल घेऊन या दोन्हीही ठेकेदारांना कारण विचारून काम करत नसल्यास हे काम दुसऱ्या ठेकेदाराला देण्यात यावे ही मागणी गावकऱ्यांच्या वतीने होत आहे. रस्त्यासाठी ग्रामपंचायतने ठराव घेतला आहे आणि आता पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना पत्र दिले आहे.
[read_also content=”शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता; अनेकांना मंत्रिपदाचे वेध! https://www.navarashtra.com/maharashtra/restlessness-among-shinde-group-mlas-many-are-looking-for-a-ministerial-position-307608.html”]
शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे मोठी अडचण होत आहे. डांबरीकरण करण्याची मागणी असताना पूर्ण झाली नाही. रस्ता नसल्याने शेतकऱ्यांनी शेतात राहुटी सुरू केली आहे. आजारी पडल्यास दवाखान्यात जाता येत नाही. शिरपूल्ली ते डोंगरगाव रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असताना प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. काही शेतकऱ्यांनी शेतातच राहणे सुरू केले आहे. दवाखान्यात जाता येत नाही. या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी आहे.
[read_also content=”अजगराने शेळीला आपल्या विळख्यात घेत केले ठार https://www.navarashtra.com/maharashtra/the-python-killed-the-goat-in-its-claws-nraa-307611.html”]