Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुठं फेडालं हे पाप! अस्वच्छ स्वयंपाक घर अन्…; विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ, कंत्राटदाराला कोणाचे संरक्षण?

शासनाने आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वसतिगृहे बांधली आणि भोजन पुरवठ्यासाठी लाखोचा कंत्राट दिली. मात्र, या वसतिगृहात ताळमेळाचा पूर्णतः अभाव दिसून येत आहे

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 07, 2026 | 03:09 PM
कुठं फेडालं हे पाप! अस्वच्छ स्वयंपाक घर अन्...; विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ, कंत्राटदाराला कोणाचे संरक्षण?

कुठं फेडालं हे पाप! अस्वच्छ स्वयंपाक घर अन्...; विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ, कंत्राटदाराला कोणाचे संरक्षण?

Follow Us
Follow Us:

लाखोंच्या कंत्राटानंतरही विद्यार्थ्यांना जेवण मिळेना 
पांढरकवडा येथील मुलांच्या वसतिगृहात गंभीर प्रकार उघडकीस 
विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शिक्षणावर विपरीत परिणाम होण्याची भीती

यवतमाळ: शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प योजनेच्या नावाखाली पांढरकवडा (Yavatmal)येथील मुलांच्या वसतिगृहात गंभीर दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. लाखोंच्या कंत्राटानंतरही विद्यार्थ्यांना दररोज देण्यात येणाऱ्या दूध, अंडी आणि फळांचा पुरवठा थांबला असून, अस्वच्छ स्वयंपाकघर आणि नियोजनाचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे

पांढरकवडा येथील वस्तीगृहात ७५ मुलांना राहण्याची व्यवस्था आहे त्यापैकी ४२ मुले सध्या वस्तीगृहात आहे मात्र वस्तीगृहात तपासणीदरम्यान सकाळी १०:३० वाजेपर्यंत जेवण तयार होत नाही आणि मेनूनुसार जेवण दिले जात नसल्याचे उघडकीस आले. विद्यार्थ्यांकडून नोंदवलेल्या तक्रारींनुसार, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अपुरे जेवण मिळते. “अंडीच मिळत नाहीत, कंत्राटदार कोण आहे हे कळत नाही कंत्राटदाराला कोण गळ्यात घालतोय कळतच नाही दूध आणि फळे कुठे जातायत?” असा सवाल उपस्थित करत विद्यार्थ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

विद्यार्थी सुरक्षेसाठी आता एकच समिती! दोन समित्यांचे एकत्रीकरण; जिल्हाधिकारी असणार समितीचे अध्यक्ष

जिल्हा प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शासनाने आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वसतिगृहे बांधली आणि भोजन पुरवठ्यासाठी लाखोचा कंत्राट दिली. मात्र, या वसतिगृहात ताळमेळाचा पूर्णतः अभाव दिसून येत आहे. आवश्यक पदार्थांचा पुरवठा न होणे यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शिक्षणावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मी पाच वर्षापासून होस्टेलमध्ये शिक्षण घेत आहे अनेकदा जेवणासंदर्भात ठेकेदाराची संवाद साधला मात्र काही प्रतिसाद मिळत नाही. ठेकेदारांना प्रश्न विचारला असता जेवणाचे पैसे आम्हाला कमी मिळतात, त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे जेवण मिळते. आम्ही विद्यार्थ्यांनी जेवण चांगले मिळावे यासाठी अनेकदा आंदोलन सुद्धा केले. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील अनेक दिवसांपासून अंडी मिळत नाही.  नॉनव्हेज जेवण्याचा दर्जा घसरलेला आहे.  सध्या जेवणाचा सुद्धा दर्जा घसरलेला आहे. त्वरित कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.  मात्र यासंदर्भात संबंधित एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प अधिकारी पांढरकवडा अमित रंजन यांच्यासोबत संपर्क साधला असता त्यांनी सखोल चौकशी करून संबंधित वर कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली आहे.

युवराज राजूरकर, विद्यार्थी पांढरकवडा वस्तीगृह

निश्चितच पांढरकवडा कळम राळेगाव येथील वस्तीगृहामध्ये जेवणाचा दर्जा खालावलेला आहे संबंधित कंत्राटदार हे मनमानी कारभार करतात या मनमानी कारभाराचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे अशा कंत्रात दारावर निश्चितच मी संबंधित अधिकारी यांच्यासोबत बोलून कारवाई करण्याचे आश्वासन देतो.

उन्हाळा होईल सुखकर! हापूस आंब्यांपासून घरच्या घरी बनवा थंडगार मँगो मस्तानी, नोट करून घ्या रेसिपी

राजू तोडसाम, आमदार

मात्र शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचत नसल्याचे सिद्ध होते. जिल्हा प्रशासनाने कडक निरीक्षण आणि चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

Web Title: Unsanitary kitchen at tribal children hostel is resulting them not receiving proper food pandharkavda yavatmal news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • food news update
  • Students
  • Yavatmal

संबंधित बातम्या

Yavatmal News: पावसाअभावी सोयाबीन करपला! ढगाळ वातावरणात किडींचा हल्ला; शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिकाची कोंडी
1

Yavatmal News: पावसाअभावी सोयाबीन करपला! ढगाळ वातावरणात किडींचा हल्ला; शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिकाची कोंडी

शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; जुन्नर तालुक्यात पुरवठा अन् गुणवत्ता तपासणी यंत्रणेची कार्यपद्धती चर्चेत
2

शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; जुन्नर तालुक्यात पुरवठा अन् गुणवत्ता तपासणी यंत्रणेची कार्यपद्धती चर्चेत

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
3

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
4

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.