Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई महानगर पालिका आणि पर्यावरण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच पर्यावरण मंत्र्याच्या मतदारसंघात खुलेआम वृक्ष कत्तल : प्रविण दरेकरांचा आरोप

पर्यावरण मंत्री ज्या मतदार संघाचे आमदार आहेत त्याच मतदार संघात खुलेआम झाडांची कत्तल होणे निषेधार्ह आहे. झाडे तोडण्यासाठी कुणाचीही परवानगी घेतलेली नाही, अशी माहिती पोलीस अधिकारी आणि स्वतः पोलीस उपायुक्तांनी दिली. असे असेल तर हे कायद्याचं राज्य आहे का, असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 06, 2021 | 04:34 PM
मुंबई महानगर पालिका आणि पर्यावरण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच पर्यावरण मंत्र्याच्या मतदारसंघात खुलेआम वृक्ष कत्तल : प्रविण दरेकरांचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : पर्यावरण दिन साजरा करत असताना आणि वसुंधरा दिवसाचा मोठा कार्यक्रम पर्यावरण विभागाकडून केला जातो. त्याच्या पूर्वसंध्येला सुमारे ४० झाडांची कत्तल राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांच्या वरळी मतदारसंघात केली जाते. मुंबई महानगर पालिका आणि पर्यावरण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे खुलेआम कत्तल करण्याची हिंमत वृक्ष शत्रू दाखवू शकले, असा आरोप विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला.

वृक्ष कत्तलीची बातमी माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर दरेकर यांनी त्याची गंभीर दखल घेऊन आज तातडीने घटनास्थळाला सकाळीच भेट दिली, त्यांच्या समवेत भाजपा मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा हे देखील होते.  पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला

हे कायद्याचं राज्य आहे का ?

पर्यावरण मंत्री ज्या मतदार संघाचे आमदार आहेत त्याच मतदार संघात खुलेआम झाडांची कत्तल होणे निषेधार्ह आहे. झाडे तोडण्यासाठी कुणाचीही परवानगी घेतलेली नाही, अशी माहिती पोलीस अधिकारी आणि स्वतः पोलीस उपायुक्तांनी दिली. असे असेल तर हे कायद्याचं राज्य आहे का, असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.

[read_also content=”…आणि ९५ वर्षाच्या बेगमबी मुजावर यांनी कोरोनाला हरवलं; दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी नतमस्तक होऊन घेतले आशीर्वाद https://www.navarashtra.com/kolhapur/95-year-old-begumbi-mujawar-defeated-corona-south-mla-rituraj-patil-bowed-down-and-took-blessings-nrvb-138751.html”]

अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा

झाडांमुळे होर्डिंग दिसत नाहीत, म्हणून या झाडांची कत्तल केली गेल्याचे अनेक राहिवाशांचे म्हणणे आहे, असे असेल ते फार गंभीर आहे.  आता वातावरण संतप्त आहे म्हणून अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण शांत होण्याची वाट न बघता, या पाठीमागे नेमके कोण आहेत याचा तपास करून संबंधित दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी दरेकर यांनी केली. साधार पुरावे असल्यामुळे आरोपींपर्यंत पोलीस पोहोचू शकतात. एवढेच नाही तर वृक्ष प्राधिकरण आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

[read_also content=”कामावर असताना प्रमाण भाषेतच बोला,अन्यथा…; रुग्णालयाने नर्सेससाठी काढलाय फतवा https://www.navarashtra.com/latest-news/speak-standard-language-while-at-work-otherwise-order-issued-by-the-delhi-government-hospital-for-nurses-nrvb-138728.html”]

वैयक्तिक द्वेषातून टीका नाही

आम्ही कोणतीही मागणी वैयक्तिक द्वेषातून करीत नाही, हा पर्यावरण मंत्र्यांचा मतदार संघ आहे आणि तिथेच अशा घटना घडत असतील, कुंपणचं शेत खायला लागले तर शेवटी लोकांनी कुणाकडून अपेक्षा धरायची, हा प्रश्न आहे. एक झाड जगवायला ७-८ वर्षांचा काळ लागतो, एका बाजूला ऑक्सिजनची कमतरता आहे, अधिकाधिक वृक्ष लावण्यासाठी सरकार पैसे खर्च करते, सामान्य नागरिकही सहभाग देतात आणि दुसऱ्या बाजूला खुलेआम कत्तल होत असेल तर सरकारने, पोलिसांनी आणि महानगरपालिकेने याची गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे, याची जाणीव करून देण्यासाठीच आज तातडीने आम्ही येथे आलो आहोत, अशी अपेक्षाही दरेकर यांनी व्यक्त केली.

Due to unforgivable negligence of Mumbai Municipal Corporation and Environment Department open tree felling in the constituency of Environment Minister Pravin Darekars allegation

Web Title: Due to unforgivable negligence of mumbai municipal corporation and environment department open tree felling in the constituency of environment minister pravin darekars allegation nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2021 | 04:34 PM

Topics:  

  • Environment Department
  • Environment Minister
  • Mumbai Municipal Corporation

संबंधित बातम्या

Pimpri-Chinchwad News : नदी सुधार प्रकल्पाच्या नावावर शहरातील तीन हजार झाडांची कत्तल
1

Pimpri-Chinchwad News : नदी सुधार प्रकल्पाच्या नावावर शहरातील तीन हजार झाडांची कत्तल

…तर हिमाचल प्रदेश देशाच्या नकाशावरून गायब होईल; सुप्रीम कोर्ट असं का म्हणालं?
2

…तर हिमाचल प्रदेश देशाच्या नकाशावरून गायब होईल; सुप्रीम कोर्ट असं का म्हणालं?

Pankaja Munde: “प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी….”;  पंकजा मुंडे विधानसभेत काय म्हणाल्या?
3

Pankaja Munde: “प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी….”; पंकजा मुंडे विधानसभेत काय म्हणाल्या?

2030 पर्यंत पाण्याच्या एका थेंबासाठी पण होतील हाल, काय होणार 60 लाख नागरिकांचं? भविष्यातील भाकीत खरे ठरणार?
4

2030 पर्यंत पाण्याच्या एका थेंबासाठी पण होतील हाल, काय होणार 60 लाख नागरिकांचं? भविष्यातील भाकीत खरे ठरणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.