दिग्दर्शन राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) आणि शाहरुख खानची (Shah Rukh Khan) जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर आली असून ‘डंकी’ (Dunki) चित्रपट गुरुवारी (31 डिसेंबर) ला रिलीज झाला. पठाण, जवान नंतर शाहरुख खानचा हा तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. डंकी हा चित्रपट रिलीज होण्याआधी या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. चित्रपट रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे. ‘डंकी’ नं पहिल्या दिवशी संथ सुरुवात केली होती तरी आता मात्र, चित्रपट थिएटरमध्ये सातत्याने कमाई करत आहे. या भावनिक चित्रपटाला कौटुंबिक प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. संमिश्र प्रतिक्रिया असूनही, लोकांच्या प्रेमामुळे ‘डंकी’ने चांगली कमाई केल्याचं दिसत आहे. चित्रपटाने आपला पहिला आठवडा उत्तम कलेक्शनसह पूर्ण केला आहे. नव्या वर्षात डंकी काहीसा संथ झाल्याचं दिसत आहे. चित्रपटानं रिलिजच्या तेराव्या दिवशी केवळ 3.85 कोटी कमावले आहेत. जो आतापर्यंतचा सर्वात कमी आकडा आहे.
डंकीने रिलीज होण्याआधी अॅडवान्स बुकींगमध्येही 37 हजारांहून अधिक तिकीटांची विक्री करून या चित्रपटाने 1 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. यावरुन चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा भरुभरुन प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. Sacknilk च्या रिपोर्टनुसार, डंकीने पहिल्याच दिवशी 29.2 कोटींची कमाई केली.दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 20.12 कोटी, तिसऱ्या दिवशी 25.61 कोटी, चौथ्या दिवशी 31.5 कोटी, पाचव्या दिवशी 46.3 कोटी, सहाव्या दिवशी 10 कोटी, सातव्या दिवशी 5.61 कोटींची कमाई केली. आठव्या दिवशी 8.5 कोटी ते 10 कोटी कमावले. नवव्या दिवशी 7.25 तर दहाव्या दिवशी 9 कोटी कमावले आहेत. अकराव्या दिवशी 12.00, बाराव्या दिवशी 9 कोटी, तेराव्या दिवशी 3.85 ची कमाई केली. एकंदरित या चित्रपटाने आतापर्यंत 235.75 कोटी कमावले आहेत.
या चित्रपटात शाहरुखने मुख्य भूमिका साकारली असून तापसी पन्नू, अनिल ग्रोव्हर, विक्रांत कोचर यांनीही या चित्रपटात त्याच्यासोबत काम केलं आहे आणि विकी कौशलने ‘डंकी’मध्ये खास भूमिका साकारली आहे, जी लोकांच्या पंसतीस उतरली आहे. चित्रपटाची कथा लोकांना आकर्षित करणारी आहे. या चित्रपटाने थिएटर्सवर वर्चस्व गाजवले आहे आणि पहिल्या आठवड्यात दमदार कमाई केली आहे.