
जगभरात सध्या राष्ट्रकुल स्पर्धेचा (Commonwealth Games 2022) धुमाकुळ सुरु आहे. दररोज अनेक देशातील खेळाडू पदकांची कमाई करून आपल्या देशाचे नाव उंचावत आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेतील खेळाडूंच्या विक्रमी कामगिरीची चर्चा सर्वदूर सुरु असताना गुरुवारी स्पर्धेच्या सातव्या दिवशी एक वेगळीच घटना समोर आली आहे. यात दोन संघांमध्ये हॉकीची मॅच सुरु असताना मैदानात खेळाडू आपापसात बिडल्याची घटना पाहावयास मिळावी. सध्या या प्रकरणाची सोशल मीडियात बरीच चर्चा रंगली असून लोकांच्या यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
राष्ट्रकुल स्पर्धेत गुरुवारी इंग्लंड (England)आणि कॅनडा (Canada) संघात हॉकीचा (Hockey) सामना रंगला होता. मात्र प्रेक्षकांना त्यात अक्षरशः कुस्ती पाहायला मिळाली. कारण या खेळाच्या लाईव्ह सामन्या काही कारणास्तव इंग्लंड आणि कॅनडाचे खेळाडू एकमेकांशी भिडल्याची घटना घडली. हा वाद इतका वाढला कि अखेर पंचांना यामध्ये येऊन हस्तक्षेप करावा लागला.
उपांत्य फेरी गाठण्यासाठी इंग्लंडला १५ गोल्सची आवश्यकता होती. १५ पेक्षा कमी गोल्स झाल्यास इंग्लंडच्या संघाचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंगणार होतं. त्यामुळे इंग्लंड संघाचे खेळाडू कॅनडाविरुद्ध गोल करण्यासाठी सतत आक्रमक खेळ दाखवत होते.
दरम्यान लाईव्ह सामन्यात बलराज पानेसरची हॉकी स्टिक इंग्लंडच्या ख्रिस ग्रिफिथच्या हाताला लागली आणि ती अडकली. यामुळे संतापलेल्या ग्रिफिथने पानेसरला धक्काबुक्की केली. त्यामुळे संतप्त झालेल्या पानेसरने इंग्लंडच्या खेळाडूची मान पकडली. मग दोघांनी एकमेकांचे टी-शर्ट पकडून ओढायला सुरुवात केली. त्यामुळे काही क्षणासाठी हॉकीच्या मैदानात कुस्तीचा फड रंगल्या सारखे वाटत होते.