नागपुरात गुढीपाडव्याचा उत्साह, लक्ष्मीनगरमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उभारली गुडी!
यंदा राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नागपुरातील लक्ष्मीनगर परिसरात गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी कार्यक्रमाला शोभायात्रेने सुरुवात करणयात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती.