amit deshmukh
मुंबई : राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या २ जून पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता १० ते ३० जून दरम्यान घेण्यात येणार आहेत अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दिली.
राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षां संदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत आज मुंबईतील मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
या परीक्षांमध्ये एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी. एच.एम.एस.,बी.पी.टी.एच.,बी.ओ. टी.एच.आणि बीएससी. नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे.
या वैद्यकीय पदवी परीक्षांसोबतच मॉडन मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसेच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Examinations for medical students in the state will start from this day Medical Education Minister Amit Deshmukh