Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गगनयान मोहिमेची पहिली उड्डाण चाचणी ३० मिनिटांसाठी पुढे ढकलली, हे कारण आलं समोर!

ISRO कडून सकाळी 8:00 वाजता चाचणी मोहीम सुरू केली जाणार होती. खराब हवामानामुळे ती 30 मिनिटांनी वाढवण्यात आली आहे. चाचणी मोहीम सकाळी 8:45 वाजता सुरू होईल.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 21, 2023 | 08:42 AM
गगनयान मोहिमेची पहिली उड्डाण चाचणी ३० मिनिटांसाठी पुढे ढकलली, हे कारण आलं समोर!
Follow Us
Follow Us:

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज श्रीहरिकोटा चाचणी श्रेणीतून गगनयान मिशन (Gaganyaan mission) चं पहिलं चाचणी उड्डाण करणार आहे. सकाळी ८ वाजता गगनयान मोहिमेसाठी चाचणी उड्डाण TV-D1 प्रक्षेपित होईल असं सांगण्यात येत होतं. मात्र, सध्याच्या इस्रोनं दिलेल्या अपडेट नुसार, खराब हवामानामुळे चाचणी उड्डाण 30 मिनिटांनी वाढवण्यात आलं आहे. चाचणी मोहीम सकाळी 8:45 वाजता सुरू होईल. मानवयुक्त गगनयान मोहिमेच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, इस्रोने क्रू मॉड्यूल सुरक्षितपणे उतरवण्याची तयारी पूर्ण केली आहे.

LVM3 रॉकेटने अवकाशात झेपावणार गगनयान

हे गगनयान LVM3 रॉकेटमधून प्रक्षेपित केले जाणार आहे. चंद्रयान-3 अवकाशात सोडणाऱ्या रॉकेटची ही अपग्रेडेड आवृत्ती आहे. चाचणीसाठी कमी किमतीच्या मूलभूत रॉकेटचा वापर केला जात आहे. LVM3 लाँच करण्यासाठी 300-400 कोटी रुपये खर्च येतो. यामुळे हे रॉकेट चाचणीसाठी वापरले जात नाही.

क्रू मॉड्यूलच वजन 4520 किलो

चाचणी रॉकेटचे वजन 44 टन आहे. त्यात सुधारित विकास इंजिन बसवण्यात आले आहे. यामध्ये द्रव इंधनाचा वापर केला जातो. क्रू मॉड्यूलचे वजन 4520 किलो आहे. चाचणीसाठी सिंगल लेयर वॉल अ‍ॅल्युमिनियम स्ट्रक्चरचे क्रू मॉड्यूल तयार केले आहे. त्यात हवेचा दाब असणार नाही. ज्या क्रू मॉड्युलमध्ये मानवांना पाठवले जाईल त्याला विमानाप्रमाणे हवेचा दाब निर्माण करावा लागेल.

क्रू एस्केप सिस्टम अंतराळवीरांचे प्राण वाचवेल

आपत्कालीन परिस्थितीत, क्रू एस्केप सिस्टम अंतराळवीरांचे प्राण वाचवेल. आज घेण्यात येणाऱ्या चाचणीत रॉकेटचे उड्डाण होणार असून त्यातील सर्व यंत्रणांचे योग्य कार्य तपासले जाणार आहे. क्रू मॉड्यूल रॉकेटपासून वेगळे कसे होते आणि ते कसे खाली येते हे पाहिले जाईल. चाचणी दरम्यान क्रू मॉड्युलमध्ये कोणतेही मानव नसतील. जेव्हा गगनयान प्रक्षेपित होईल, तेव्हा अंतराळवीर क्रू मॉड्यूलमध्ये राहतील.

Web Title: First flight test of gaganyaan mission postponed for 30 minutes says isro nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2023 | 08:36 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.