Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑनलाईन क्लाससाठी इंटरनेट मिळवे म्हणून जवळपास महिनाभर त्याने घरापासून ४ किमीवर असलेल्या टॅक्सी स्टँडपर्यंत केला प्रवास

अनिश्चित भविष्याची टांगती तलवार विद्यार्थ्यांना भीतीदायक वाटत होती. मात्र या निराशेच्या आणि संघर्षमय वातावरणात अनेक यशोगाथांचा जन्म झाला. या कथा सर्व विद्यार्थी समुदायाकरिता नक्कीच प्रेरणादायी ठरतील. अनेकांनी विपरीत स्थितीवर मात करत, त्यावर विजय मिळवत संधी देखील शोधल्या आहेत. मुंबईतील नेरूळ शाखेच्या आकाश इन्स्टिट्यूटचा १८ वर्षीय विद्यार्थी प्रणव याची यशोगाथा प्रेरित करणारी आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Jul 02, 2021 | 08:20 PM
ऑनलाईन क्लाससाठी इंटरनेट मिळवे म्हणून जवळपास महिनाभर त्याने घरापासून ४ किमीवर असलेल्या टॅक्सी स्टँडपर्यंत केला प्रवास
Follow Us
Close
Follow Us:

रायगड : कोविड-१९ महासाथीच्या दुसऱ्या लाटेचा फटका जवळपास सर्वांना सहन करावा लागला. प्रामुख्याने विद्यार्थी वर्गाकरिता टाळेबंदी तणाव निर्माण करणारी ठरली. एकीकडे सातत्याने परीक्षांचे वेळापत्रक बदलत होते, तर दुसरीकडे ऑनलाईन स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू होती.

अशा स्थितीत पुन्हा अनिश्चित भविष्याची टांगती तलवार विद्यार्थ्यांना भीतीदायक वाटत होती. मात्र या निराशेच्या आणि संघर्षमय वातावरणात अनेक यशोगाथांचा जन्म झाला. या कथा सर्व विद्यार्थी समुदायाकरिता नक्कीच प्रेरणादायी ठरतील. अनेकांनी विपरीत स्थितीवर मात करत, त्यावर विजय मिळवत संधी देखील शोधल्या आहेत. मुंबईतील नेरूळ शाखेच्या आकाश इन्स्टिट्यूटचा १८ वर्षीय विद्यार्थी प्रणव याची यशोगाथा प्रेरित करणारी आहे.

प्रणवचे वडील हे प्राथमिक शाळा शिक्षक असून त्यांच्यावर पाच व्यक्तींच्या कुटुंबाची जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील वळवटी गावाला मागच्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा सहन करावा लागला. त्यामुळे गावात बरेच नुकसान झाले. दुर्देवाने या वादळात प्रणवच्या घराची देखील पडझड झाली. निसर्गच्या झंझावातात विजेचे अनेक खांब उन्मळून पडल्याने महिन्यांहून अधिक काळ गावात वीज नव्हती. एकीकडे डोक्यावरचे छत गमावले तर दुसरीकडे वीज पुरवठा खंडित झाला. या दोन्ही गरजा पूर्ण करण्यासाठी प्रणवच्या कुटुंबाला मोठा संघर्ष करावा लागला.

[read_also content=”व्हेज हेअर डाय (Vegan Hair Dye) वापरल्याने केसांना होतात हे ७ फायदे; ही गोष्ट पुन्हा पुन्हा हवीहवीशी वाटेल https://www.navarashtra.com/latest-news/benefits-of-vegen-hair-dye-nrvb-150085.html”]

दरम्यानच्या काळात मुंबईतील आकाश इन्स्टिट्यूटमध्ये शिकवणीसाठी जाणाऱ्या प्रणवला टाळेबंदीमुळे केवळ तीन वर्गांत प्रत्यक्ष जाऊन उपस्थिती लावता आली. त्यानंतर त्याला गावी परतणे भाग होते. घरात केवळ एकच स्मार्टफोन उपलब्ध होता, त्यातच दुर्गम भाग असल्याने इंटरनेटही धड मिळायचे नाही. मात्र प्रणवने आशा सोडली नाही. त्याने डॉक्टर होण्याच्या स्वप्नाचा पिच्छा पुरवत मोठ्या धीराने परिस्थितीचा सामना केला. महाराष्ट्रातील एखाद्या नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात आपल्याला प्रवेश मिळावा हे प्रणवचे स्वप्न आहे!

आपला संघर्ष शब्दांत मांडताना प्रणव म्हणाला की, “मला ऑनलाईन क्लासमध्ये सहभागी होण्याकरिता बरीच कसरत करावी लागली. आम्ही राहत असलेला भाग दुर्गम असल्याने इथे वीज आणि इंटरनेटची समस्या वरचेवर यायची. मागच्या वर्षी, मी आकाश ऑनलाईन क्लासमध्ये सहभागी होण्यासाठी घरापासून ४ किमी प्रवास केला. तिथे असलेल्या टॅक्सी स्टँडवर इंटरनेट कनेक्टिविटी मिळायची. माझ्या घराचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत आणि घरात वीज येईपर्यंत जवळपास महिनाभर टॅक्सी स्टँडवर जात राहिलो. स्मार्टफोनवर अभ्यास करणे देखील कष्टाचे होते. कारण दरवेळी घरात कोणाला तरी फोनची गरज असायची. आमच्याकडे लॅपटॉपची सुविधा नव्हती.”

आकाश इन्स्टिट्यूटने टाळेबंदीचा फटका बसलेल्या शहर आणि ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न केले. या भागांमधील विद्यार्थ्यांचा अभ्यास थांबू नये आणि ते प्रवाहात मागे पडू नये म्हणून त्यांना सहाय्य केले. आकाश इन्स्टिट्यूटच्या देशातील सर्व शाखांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी बरीच मेहनत घेतली, त्यांच्या शंकांचे निरसन केले आणि त्यांना अपेक्षित पायाभूत सुविधा मिळवून देण्यात तसेच समस्या सोडविण्याकरिता मदतीचा हात दिला.

[read_also content=”कॅनडामध्ये उष्णतेने १०,००० वर्षांचा विक्रम मोडला, उष्माघाताने एका दिवसात २३० जण दगावले https://www.navarashtra.com/latest-news/heat-wave-in-canada-233-people-die-in-24-hours-nrvb-149773.html”]

याविषयी बोलताना आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आकाश चौधरी म्हणाले की, “अत्यंत विपरीत स्थितीत फार कमी वयात विद्यार्थी धैर्याने वास्तवाला सामोरे जातात हे पाहणे हृदय पिळवटून टाकणारे होते. त्यांचा स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा दृढनिश्चय म्हणजे एक कहाणी ठरेल. अनेकांकरिता टाळेबंदी कठीण स्थिती निर्माण करणारी ठरली. मात्र त्यातही प्रणवसारखी रत्न आपल्यासमोर आली. आकाशमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम अभ्यास अनुभव देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. अशा कठीण परिस्थितीत उद्दिष्ट गाठण्यासाठी दृढनिश्चयी आहोत. आम्ही दुर्गम भागात राहणाऱ्या अशा मुलखावेगळ्या विद्यार्थ्यांना पाठबळ देण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहोत. प्रणवला नीट परीक्षेत घवघवीत यश मिळून त्याची स्वप्ने साकार व्हावी याकरिता माझ्या अनेक शुभेच्छा!”

For almost a month he traveled to a taxi stand 4 km from home to get internet for online classes

Web Title: For almost a month he traveled to a taxi stand 4 km from home to get internet for online classes nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2021 | 08:20 PM

Topics:  

  • Online Classes

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.