मुख्यमंत्री माझी लाकडी बहिण योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले जात आहे. या योजनेला मिळेल्या प्रतिसादाचा जल्लोष साजरा करण्याकरीता कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री लाकडी बहिण योजनेचा कार्यक्रम सोमवारी शिंदे सेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून आयोजित करण्यात आला आहे.
सोमवारी छत्रपती शिवाजी चौकात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री लाकडी बहिण योजनेचा प्रचार प्रसार केला जाणार आहे. या ठिकाणी भव्य स्टेजची उभारणी करण्यात आली आहे. सोमवारी नारळी पौर्णीमा आणि रक्षाबंधनाचा सण आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त कल्याणमधील आगरी कोळी बांधव भव्य शोभा यात्रा काढतात. ही शोभा यात्रा छत्रपती शिवाजी चौकातून काढली जाते.
अनोखे रक्षाबंधन
या शोभा यात्रेत सहभागी महिला या आमदार भोईर यांना राख्या बांधणार आहे. बांधलेल्या राख्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविल्या जाणार आहे. तसेच स्टेजवर मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेली १२ बाय सहा आकाराच्या सहा राख्या तयार करण्यात आलेल्या आहेत. त्याठिकाणी खासदार आणि आमदारांचे कटआऊट उभारण्यात आले आहे. मुख्यमंत्री लाकडी बहिण योजनेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कल्याणमध्ये सोमवारी भगवे वातावरण तयार होणार असल्याची माहिती शिंदे सेनेचे उपशहर प्रमुख नितीन माने यांनी सांगितले.
रक्षाबंधनापूर्वीच योजनेचे 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता खात्यामध्ये जमा झाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्यभरातील महिलांच्या खात्यामध्ये 3 हजार रुपये जमा झाले आहेत. रक्षाबंधनापूर्वीच सरकारने राज्यातील महिलांना भेट दिली. ज्या महिलांनी 31 जुलैपूर्वी अर्ज दाखल केलेत अशा महिलांच्या खात्यात जून आणि जुलै महिन्याचे एकूण 3000 रुपये पैसे जमा होत आहेत . ज्या महिलांनी त्यानंतर अर्ज भरले आहेत, त्यांना आज (17 ऑगस्ट ) रोजी या योजनेतील पैसे जमा होतील, असं सरकारनं स्पष्ट केलंय. राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेमध्ये महिलांच्या बँक खात्यात प्रतिमाह 1500 रुपये जमा होणार आहेत.21 ते 65 वयोगटामधील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ दिला जात आहे.