Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाबासाहेबांना अभिवादन चैत्यभूमीवर जनसागर उसळला; कोट्यवधी नागरिकांनी लाडक्या भीमरायाला केले अभिवादन

Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din : बाबासाहेबांनी केलेल्या उत्तुंग कार्याने देशातील कोट्यवधी नागरिकांच्या प्रगतीचा, समान संधीचा मार्ग मोकळा केला. त्याची आठवण ठेवून महापरिनिर्वाण दिनी लाखोंचा जनसागर चैत्यभूमीवर उसळला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Dec 06, 2023 | 09:27 PM
बाबासाहेबांना अभिवादन चैत्यभूमीवर जनसागर उसळला; कोट्यवधी नागरिकांनी लाडक्या भीमरायाला केले अभिवादन
Follow Us
Close
Follow Us:
Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( (Dr Babasaheb Ambedkar)) यांना अभिवादन करण्यासाठी आज चैत्यभूमीवर (Chaityabhumi) जनसागर उसळला. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.  महामानवास अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो नागरिकांची गर्दी उसळली होती.
भारतातील वर्ग लढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) प्रेरणादायी ठरले आहेत. वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले होते.
भारतीय कामगारांसाठी अनेक मोलाचे कायदे
स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणा आणि अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली.  बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिश सरकारमध्ये मजूर मंत्री होते. त्यांनी त्या कालावधीत भारतीय कामगारांसाठी अनेक मोलाचे कायदे करून घेतले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.
समाज परिवर्तनासोबत सशक्त भारताच्या निर्मितीसाठी दिशा
जातीव्यवस्थेने अस्पृश्य समाजाला दिलेल्या गुलामीच्या बेड्या तोडताना समाज परिवर्तनासोबत सशक्त भारताच्या निर्मितीसाठी दिशा दाखवण्याचे काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. बाबासाहेबांनी केलेल्या उत्तुंग कार्याने देशातील कोट्यवधी नागरिकांच्या प्रगतीचा, समान संधीचा मार्ग मोकळा केला. त्याची आठवण ठेवून महापरिनिर्वाण दिनी लाखोंचा जनसागर चैत्यभूमीवर उसळतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक पुढील वर्षी तयार होणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
पुढील महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर अभिवादन करू. पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर साजरा करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सत्तेचा वापर परिवर्तनासाठी, समृद्धीचे दिवस आणण्यासाठी काम सुरू आहे. जगाला हेवा वाटेल असं हे स्मारक असणार आहे. अनेक कल्याणकारी योजना राबवत आहोत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
विद्रोही, आंबेडकरी गीतांचा जागर ते पुस्तक खरेदीसाठी गर्दी
आंबेडकरी, विद्रोही गीतांच्या माध्यमातून बाबासाहेब आंबडेकर यांना अभिवादन करण्यात आले. काही शाहिरी कलापथकांकडून आंबेडकरी, विद्रोही गीते सादर करण्यात आली. तर, गौतम बुद्ध, महात्मा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आदींच्या प्रतिमा घेण्यासाठीदेखील लोकांची गर्दी दिसून आली. त्याशिवाय, छत्रपती शिवाजी पार्क मैदानात आणि परिसरात असलेल्या पुस्तकांच्या स्टॉलवर पुस्तक खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी दिसली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तकांची सवलतीच्या दरात विक्री होत असल्याने त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. शासन आणि इतर प्रकाशकांच्या स्टॉलवर लोकांची गर्दी दिसून आली.
चैत्यभूमी परिसरात व्यवस्था
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मुंबई शहर आणि उपनगरामध्ये शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तर, मुंबई महापालिकेसह इतर अनेक संस्था संघटनांच्यावतीने चैत्यभूमीवर अनुयायांसाठी विविध व्यवस्था केली होती. तर, रेल्वेने अतिरिक्त वाहतूक सोडण्यात आली होती. तर, बेस्ट प्रशासनानेदेखील बसेस सोडल्या होत्या. तर, विविध संस्था, संघटनांच्यावतीने अनुयायांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

Web Title: Greetings to babasaheb sea of people erupted at chaityabhoomi millions of citizens saluted the beloved bhimraya nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2023 | 09:26 PM

Topics:  

  • Ambedkar Mahaparinirvan Din
  • Dr. Babasaheb Ambedkar

संबंधित बातम्या

हाताशी पुस्तक, मुखी बुद्धवंदना आणि पुढे जे घडलं…! डॉ. आंबेडकरांच्या निधनापूर्वीचे 24 तास कसे होते?
1

हाताशी पुस्तक, मुखी बुद्धवंदना आणि पुढे जे घडलं…! डॉ. आंबेडकरांच्या निधनापूर्वीचे 24 तास कसे होते?

महापरिनिर्वाणाची बातमी कळली अन् थेट घरदार विकलं! गोष्ट आंबेडकरांच्या ‘निर्वाण यात्रा’ चित्रित करणाऱ्या अवलिया कलाकाराची
2

महापरिनिर्वाणाची बातमी कळली अन् थेट घरदार विकलं! गोष्ट आंबेडकरांच्या ‘निर्वाण यात्रा’ चित्रित करणाऱ्या अवलिया कलाकाराची

Mahaparinirvan Din: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महाराष्ट्रातील आणि देशातील महत्त्वाचे कार्य
3

Mahaparinirvan Din: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महाराष्ट्रातील आणि देशातील महत्त्वाचे कार्य

Babasaheb Ambedkar: बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार, जीवनाला मिळेल योग्य दिशा; नक्की वाचा 
4

Babasaheb Ambedkar: बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार, जीवनाला मिळेल योग्य दिशा; नक्की वाचा 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.