चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून उपायुक्त संदीप कदम यांची झाडाझडती
शिक्षण हा राज्यघटनेनुसार सर्वांचा मुलभूत हक्क आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारकडून प्राथमिक शिक्षणाच्या साई सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक राज्य विद्यापीठे जी विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाच्या सोई सुविधा देत आहेत. दिव्यांग बांधवांसाठीही स्वतंत्र विद्यापीठाची उभारणी लवकरच महाराष्ट्र राज्यात केली जाणार आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा अशी सूचना दिल्या आहेत. यासंबंधी मंत्रालयात दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेसंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीला आमदार बच्चू कडू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, या विद्यापीठाच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील, आणि त्यामुळे त्यांच्या कौशल्यांचा विकास होईल, विद्यापीठाचा प्रस्ताव तयार करताना या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठ्यक्रमांसोबतच विशेष प्रशिक्षण कार्यक्रम, संशोधन आणि इतर उपक्रमांमध्ये अधिकाधिक सहभागी होण्याची संधी उपलब्ध होईल असा प्रस्ताव तयार करावा. प्रस्ताव तयार झाल्यानंतर मंत्रीमंडळ बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
या निर्णयामुळे दिव्यांगांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला नक्कीच गती मिळेल असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
देशातील पहिले दिव्यांग विद्यापीठ
जगद्गुरू रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालय हे भारतातील उत्तरप्रदेश राज्यात चित्रकुट धाम येथे असलेले द्वियांगांसाठीचे विद्यापीठ आहे विशेष म्हणजे हे विद्यापीठ अपंगांसाठीचे जगातील पहिले विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना 2001 साली झाली होती. या विदयापीठात संस्कृतभाषा, हिन्दीभाषा, आङ्ग्लभाषा, समाजशास्त्र, मनोविज्ञान, गानविद्या, चित्रकला, ललितकला, विशिष्टशिक्षण, शिक्षण, इतिवृत्त, संस्कृति एवं पुरातत्त्व, अभिकलित्र व सूचना विज्ञान, व्यावसायिकशिक्षा, विधि, अर्थशास्त्र, प्रोस्थेटिक्स व ओर्थोटिक्स सहित अनेक शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर व डॉक्टरेट डिग्री प्रदान केली जाते. या विदयापीठाचा उद्देश्य अपंग विद्यार्थ्यांना स्वतंत्र नागरिक व सक्षम मानव-संसाधन म्हणुन तयार करणे हा आहे. या विदयापीठातील सर्व सुविधा – म्हणजे वर्ग, विद्यार्थीवास, क्रीड़ासुविधा व् प्रयोगशाला इ. अत्यंत अपंग-अनुकूल आहेत.
डॉ. शकुंतला मिश्रा नॅशनल रिहॅबिलिटेशन विद्यापीठ
डॉ. शकुंतला मिश्रा नॅशनल रिहॅबिलिटेशन युनिव्हर्सिटीची स्थापना उत्तर प्रदेश सरकारच्या 2009 द्वारे करण्यात आली हे सरकारी विद्यापीठ आहे. या विद्यापीठात कला, वाणिज्य आणि व्यवस्थापन, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, कायदा, संगीत आणि ललित कला, विज्ञान आणि तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आणि विशेष शिक्षण यासह अनेक विद्याशाखा आहेत.