
फोटो सौजन्य - Social Media
जसं केसांमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळाच लुक मिळतो, (beauty tips marathi) तसंच जाड आणि सुंदर आयब्रो (भुवया) चेहऱ्याचं सौंदर्य अनेक पटींनी वाढवतात. पण ताण, हार्मोनल बदल, वारंवार थ्रेडिंग करणं किंवा पोषणाची कमतरता यामुळे अनेकांच्या भुवया पातळ होतात. काहींच्या भुवया जन्मतःच विरळ असतात, ज्यामुळे चेहऱ्याचा लुक अपूर्ण वाटतो. पण काळजी करू नका! काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही तुमच्या आयब्रोला पुन्हा घनदाट आणि सुंदर बनवू शकता.
अरंडीचे तेल (Castor Oil)
अरंडीचे तेल हे भुवया दाट करण्यासाठी सर्वात प्रभावी घरगुती उपाय मानले जाते. रोज झोपण्यापूर्वी थोडं तेल कापसाच्या बोळ्यावर घेऊन आयब्रोवर हलक्या हाताने लावा आणि रात्रभर तसेच ठेवा. काही दिवसांतच फरक जाणवेल आणि भुवयांची वाढही जलद होईल.
नारळाचे तेल (Coconut Oil)
नारळाचं तेल विटामिन E ने समृद्ध असतं, जे केसांच्या मुळांना पोषण देते. रोज रात्री आयब्रोवर हलकं मसाज करा. यामुळे केसांची वाढ तर होईलच, पण हिवाळ्यात येणारी कोरडेपणा किंवा रूसीही दूर राहील.
एलोवेरा जेल (Aloe Vera Gel)
एलोवेरा भुवयांच्या रोमछिद्रांना पोषण देतो आणि नैसर्गिकरीत्या त्यांची वाढ वाढवतो. घरी एलोवेराचा रोप असेल तर त्यातून जेल काढा आणि थेट आयब्रोवर लावा. नसेल तर बाजारातील नैसर्गिक एलोवेरा जेल वापरू शकता. नियमित वापराने भुवया चमकदार आणि घनदाट दिसतील.
कांद्याचा रस (Onion Juice)
कांद्याच्या रसात सल्फर मोठ्या प्रमाणात असतो, जो केसांच्या वाढीसाठी महत्त्वाचा घटक आहे. कांद्याचा रस कापसाने आयब्रोवर हलका लावा आणि ५-१० मिनिटांनी धुवा. यामुळे भुवयांच्या मुळांना बळकटी मिळेल आणि वाढही जलद होईल.
ऑलिव्ह ऑयल (Olive Oil)
ऑलिव्ह ऑयलमध्ये नैसर्गिक फॅटी अॅसिड्स आणि व्हिटॅमिन्स असतात, जे आयब्रोच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी आयब्रोवर हलकं मसाज करा. फक्त १५ दिवसांतच तुमच्या भुवया अधिक दाट आणि आकर्षक दिसतील.
नियमित काळजी घ्या!
या सर्व उपायांसोबत संतुलित आहार, पुरेसं पाणी आणि चांगली झोप हेही तितकेच महत्त्वाचे आहेत. नियमितपणे या उपायांचा वापर केल्यास काही आठवड्यांतच तुम्हाला तुमच्या भुवयांमध्ये लक्षणीय बदल दिसेल.