मानसिक तणाव असल्यास शरीर देतं हे 5 संकेत, चुकुनही करु नका दुर्लक्ष
धावपळीच्या जीवनशैलीमुळे कामाचा ताण येतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे त्यामुळे जर तुम्ही मानसिक नैराश्याने ग्रस्त असाल तर याचा थेट परिणाम शरीरावर होतो. ऑफिसमधल्या कामाचा व्याप तसंच नातेसंबंधातील मतभेद,यामुळे अनेकजण मानसिक नैराश्याने त्रस्त झाले आहेत. सतत नकारात्मक अतिविचार, कशाला तरी घाबरुन राहणं किंवा एखाद्या व्यक्तीचा आलेला राग व्यक्त न करता येणं यासगळ्यामुळे तुमच्या शरीराची सायकल बदलते. असं डॉक्टरांकडून सांगितलं जातं.जाणून घेऊयात मानसिक नैराश्य आल्यावर शरीर काय संकेत देतं ?
सतत झोप येणे
सतत अतीविचार केल्याने शरीरात पाण्याची कमरता निर्माण होते. त्यामुळे मेंदूला थकवा जाणवतो. मानसिक तणाव असलेल्या व्यक्तीला एकतर निद्रानाश होण्याची समस्या असते किंवा थकवा जाणवल्यामुळे सतत झोप येते. सतत येणाऱ्या अपयशामुळे एखादी व्यक्ती अत्यंत नकारात्मक विचार करायला लागते. त्यामुळे मेंदूवर ताण येतो आणि योग्य निर्णय घेण्याना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. म्हणून सर्वात आधी नकारात्मक विचार करणं टाळावं असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.
हेही वाचा- सतत च्युईंगम चघळणे आरोग्यासाठी ठरेल घातक! जाणून घ्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम
केसांत कोंडा होणं किंवा त्वचा कोरडी पडणं
एखादी व्यक्ती जेव्हा मानसिक तणावात असते तेव्हा तिचं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. बऱ्याच जणांना तणावाखाली असताना जेवण जात नाही. शरीराला पोषक तत्वं न मिळाल्यामुळे त्वचा कोरडी पडणं, केसांत कोंडा होणं या समस्या निर्माण होतात. आपल्या शरीराच्या इतर अवयवांपेक्षा ओठ तीनपट अधिक नाजूक असतात. फक्त थंडीतच नाही तर वर्षाचे बाराही महिने तुमचे ओठ कोरडे पडत असतील तर तुम्ही मानसिक तणावाखाली असल्याची ही लक्षणं आहेत.
पोट साफ न होणं
सतत चिंता करत राहिल्याने याचा परिणाम पचनसंस्थेवर होतो. खाल्लेलं अन्न न पचणं यामुळे पोटात गॅस होणं, पोट फुगणं या अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे सतत पित्ताचा त्रास, डोकेदुखी होत राहते. सततच्या अतिविचारामुळे हार्मोन्स संतुलित राहत नाही. याचा गंभीर परिणाम थेट शरीरारवर होतो.
हेही वाचा- नवरात्रीमध्ये सकाळच्या नाश्त्यात बनवा स्वादिष्ट पौष्टिक रताळ्याचे चाट, वाचा सोपी रेसिपी
मासिकपाळी संबंधित समस्या
महिलांमध्ये मानसिक तणावाचं प्रमाण वाढत आहे. याचा परिणाम म्हणजे मासिक पाळीमध्ये अतिरिक्त रक्तस्त्राव होणं. म्हणूनच पाळीच्या दिवसात मूड स्विंग्स होत असतील तर संगीत ऐका, छंद जोपासा असं मानसशास्त्रतज्ञ सांगतात.
श्वसनाशी संबंधित आजार होणं
मानसिक नैराश्याने ग्रासलेली व्यक्ती सतत नकारात्मक कल्पना करत असते. बऱ्याचदा हे अतिविचार फक्त मनाचे खेळ असतात. आपण समजत असतो तितकं गंभीर वास्तवात काही झालेलं नसतं मात्र विचारांच्या प्रवाहात आपण वाहवत जातो. त्यामुळे अनेकांना श्वसनाचा त्रास होण्याची समस्या होतें. सतत सर्दी किंवा दमा सारखा आजार वाढण्यासाठी मानसिक तणाव कारणीभूत ठरतो.
(ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)