मुंबई : आयआयटी मुंबईच्या आवारात असलेल्या जुन्या हाॅस्टेलची अवस्था दयनीय झाली आहे. हाॅस्टेलची दुरुस्ती करण्यात आर्थिक चणचण भासत आहे, ही बाबत लक्षात घेत माजी विद्यार्थ्यांची संघटना असलेल्या आयआयटी मुंबई अॅल्युमनी असोसिएशन (आयआयटीबीएए) आणि आयआयटी मुंबई हेरिटेज फाऊंडेशन (आयआयटीबीएचएफ) यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आयआयटी मुंबईच्या परिसरात जागतिक दर्जाचे हॉस्टेल उभारण्याची जबाबदारी घेतली आहे. यासंदर्भात या दोन्ही संघटनांनी नुकताच आयआयटी मुंबईसोबत करारही केला असल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन दशकामध्ये आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांची संख्या तीन हजारांहून १० हजारांच्या पार गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. तसेच जुन्या वसतीगृहांची अवस्था बिकट झाली असून, त्यांची पुनर्बांधणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र आयआयटीकडे असलेल्या पुरेशा निधी उपलब्ध नसल्याने दुरुस्तीमधील अडथळा ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या निवासस्थानाची उत्तम सोय करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.
आयआयटी मुंबईच्या परिसरातील पवई तलावाच्या बाजूला असलेल्या एच७ व एच ८ या हॉस्टेलच्या जागी नवे अद्ययावत हॉस्टेल उभारण्यात येणार आहे. हॉस्टेल उभारणीसाठी लागणारा १२० ते १३५ कोटींच्या निधीची तरतूद माजी विद्यार्थी करणार आहेत. या हॉस्टेलची निर्मिती, त्यासाठीचा निधी, प्लॅनिंग अशी सर्व जबाबदारी माजी विद्यार्थ्यांनी उचलली आहे. कॅम्पसमध्ये असलेले एच७, एच८, एच१०, एच११ हे हॉस्टेल सर्व आयआयटी विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या घरासारखे आहेत. त्यामुळे आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हे हॉस्टेल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अन्य विद्यार्थ्यांनाही पुढे येण्याचे आवाहन केल्याचे १९९३ च्या बॅचचे माजी विद्यार्थी सुधीर निकम यांनी सांगितले.
आमच्या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा पुरवण्यामध्ये आमचा हातभार लागत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. देशातील उत्तम संस्थांपैकी असलेल्या आयआयटी मुंबईचा दर्जा कायम ठेवण्याचे आमचे प्रयत्न असल्याचे आयआयटी मुंबई अॅल्यमनी असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नायक यांनी सांगितले.
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]
[read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार https://www.navarashtra.com/latest-news/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732.html”]
[read_also content=”मुंबईहून दीड ते पावणे दोन तासांत औरंगाबादला पोहचणार; मुंबई ते नागपूर धावणार बुलेट ट्रेन ! https://www.navarashtra.com/latest-news/it-will-reach-aurangabad-in-two-and-a-half-hours-from-mumbai-bullet-train-to-run-from-mumbai-to-nagpur-nrvk-170470.html”]
[read_also content=”खून करणाऱ्यांना फाशी तर चोरी करणाऱ्यांचे अवयव कापले जातात; सगळ्यात डेंजर आहेत ताबिवानी कायदे https://www.navarashtra.com/latest-news/murderers-are-hanged-and-thieves-are-mutilated-the-most-dangerous-are-the-tabiwani-laws-nrvk-170103.html”]
[read_also content=”तालिबान किती श्रीमंत? अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत https://www.navarashtra.com/latest-news/how-rich-is-the-taliban-what-else-is-the-source-of-income-along-with-poppy-cultivation-170106.html”]
[read_also content=”धावते विमान पकडण्याचा प्रयत्न! तालिबानी दहशतीने घेतला जीव; अफगाणिस्तानात विमान हवेत असताना तीन जण पडले https://www.navarashtra.com/latest-news/trying-to-catch-a-running-plane-taliban-terrorized-three-people-fell-while-the-plane-was-in-the-air-in-afghanistan-nrvk-170020.html”]
[read_also content=”चार कार पैशांनी भरल्या, हेलिकॉप्टरमध्येही पैसे कोंबले, काही पैसे रस्त्यावर पडले; अफगाणिस्तानचे राष्ट्रपती गेले कुठे? https://www.navarashtra.com/latest-news/four-cars-filled-with-money-even-in-a-helicopter-money-crashed-some-money-fell-on-the-road-where-did-the-president-of-afghanistan-go-nrvk-170034.html”]
[read_also content=”अफगानिस्तानात तालिबानी अत्याचाराचा कहर; अडकलेल्या भारतीयांचा काय करायचे? मोदी सरकारसमोरचे पाच प्रश्न https://www.navarashtra.com/latest-news/four-cars-filled-with-money-even-in-a-helicopter-money-crashed-some-money-fell-on-the-road-where-did-the-president-of-afghanistan-go-nrvk-170034.html”]
[read_also content=”अफगाणिस्तानात तालिबानी हुकूमत! पाकिस्तान, चीन, इराणचा तालिबानला पाठिंबा https://www.navarashtra.com/latest-news/taliban-rule-in-afghanistan-pakistan-china-iran-support-taliban-nrvk-170043.html”]
[read_also content=”आत्महत्येपूर्वी पूजा मद्यधुंद होती! व्हिसेरा अहवालात मोठा खुलासा; राठोड यांच्या अडचणी कायम https://www.navarashtra.com/latest-news/pooja-was-drunk-before-committing-suicide-big-revelation-in-the-viscera-report-rathores-problems-persist-nrvk-165091.html”]
[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/latest-news/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606.html”]
[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/latest-news/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609.html”]
[read_also content=”19 वर्षीची पोरगी ६७ वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत पळून गेली आणि… https://www.navarashtra.com/latest-news/19-year-old-girl-married-to-old-man-sit-will-investigate-nrvk-164601.html”]
[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/latest-news/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211.html”]
[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725.html”]