पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांना मंत्री बनवण्याची शिफारस केली होती. इम्रान यांनी हा संदेश त्याच्या आणि सिद्धूच्या कॉमन फ्रेंडमार्फत पाठवला होता. तुम्ही सिद्धूला तुमच्या सरकारमध्ये घ्या, चालत नसेल तर हाकलून द्या, असे त्यांना सांगण्यात आले.
पाकिस्तानचे पंतप्रधान सिद्धू यांची शिफारस करत असल्याचे कळल्यावर त्यांनाही आश्चर्य वाटले. मला सांगण्यात आले की त्यांची सिद्धूशी मैत्री आहे, त्यामुळे त्यांना सिद्धूला मंत्री बनवायचे आहे. असे ते म्हणाले.मात्र, सोमवारी चंदीगडमध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांना याबाबत विचारण्यात आले असता, त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.
कॅप्टन यांचा दावा – सोनिया-प्रियांका गांधी यांना संदेश पाठवला होता.
कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, मी हे संदेश सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांना पाठवले आहेत. यावर सोनिया गांधीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र प्रियांका म्हणाल्या की, एक मूर्ख माणूस आहे जो असे मेसेज करत आहेत.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी काय दिलं स्पष्टीकरण
नवज्योतसिंग सिद्धू यांनी आम आदमी पक्षाच्या सर्वेक्षणासंदर्भात चंदीगडमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या दाव्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, हा आजचा मुद्दा नाही. याबाबत पुन्हा पत्रकार परिषद घेऊन उत्तर देऊ.
[read_also content=”चंद्रशेखर बावनकुळे यांना कोरोनाची लागण https://www.navarashtra.com/latest-news/chandrasekhar-bavankule-found-corona-positive-227318.html”]