Shan Masood Century PAK vs ENG 1st Test : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड मालिकेतील मुलतान येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यावर पाकिस्तान संघाने पूर्णपणे वर्चस्व राखले आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने 4 गडी गमावून 328 धावा केल्या होत्या. या सामन्यात शान मसूदने शतक झळकावून इतिहास रचला आहे आणि 1,524 दिवसांनी शतक झळकावल्यामुळे तो चर्चेत आहे. मसूदचा डाव १५१ धावांवर संपुष्टात आला.
बाबर आझमसहीत पाकिसान टीमने दिले शान मसूदला स्टॅडींग ओव्हेशन
All class on the opening day of the series 💫
Shan raises his bat to the fans' applause 💯#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/MTei96UfKO
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 7, 2024
शानचे दमदार शतक
शान मसूदने 102 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे पाचवे शतक आहे, ज्यासाठी त्याच्या नशीबाने त्याला 4 वर्षे वाट पाहात ठेवले. त्याने आपले शतक पूर्ण केले तेव्हा बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीसह संपूर्ण ड्रेसिंग रूम टाळ्या वाजवत होता. 8 धावांच्या स्कोअरवर पाकिस्तानची पहिली विकेट पडली असताना शान फलंदाजीला आला. कर्णधार येताच त्याने अत्यंत आक्रमक पद्धतीने फलंदाजी सुरू केली आणि अवघ्या 43 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
4 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर शान मसूदचे शतक
जवळपास 4 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर शान मसूदने कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावताच बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी उभे राहिले आणि जोरजोरात टाळ्या वाजवू लागले. शतक झळकावल्याबद्दल शान मसूदला स्टँडिंग ओव्हेशन देत पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूमचा व्हिडिओ पीसीबीने सोशल मीडियावरही शेअर केला आहे. हा व्हिडिओ अपलोड होताच सोशल मीडियावर लोकप्रिय झाला.
स्वतःचा रेकाॅर्ड मोडण्यात अपयशी
शान मसूदचा कसोटी सामन्यांच्या एका डावात सर्वोच्च धावसंख्या 156 धावा आहे, जी त्याने 2020 मध्ये इंग्लंडविरुद्ध केली होती. जर आपण शान मसूदच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याच्याकडे सध्या 36 सामन्यांच्या 67 डावांमध्ये 2,034 धावा आहेत. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 5 शतके आणि 10 अर्धशतके झळकावली आहेत.