Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK vs USA , T-20 World Cup : फरहानने पाकिस्तानची लाज राखली! USA समोर 191 धावांचे लक्ष्य; शाल्कविकचा विकेट्सचा चौकार 

आज टी-20 विश्वचषक २०२६ च्या  १२ व्या सामन्यात पाकिस्तान आणि यूएसए आमनेसामने आले आहेत. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तान संघाने अमेरिका संघासमोर १९१ धावांचे लक्ष्य दिले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 10, 2026 | 08:46 PM
PAK vs USA, T-20 World Cup: Farhan saves Pakistan! USA set 191-run target; Schalkewick takes four wickets

PAK vs USA, T-20 World Cup: Farhan saves Pakistan! USA set 191-run target; Schalkewick takes four wickets

Follow Us
Close
Follow Us:

PAK vs USA , T-20 World Cup 2026 : आज टी-20 विश्वचषक २०२६ च्या  १२ वा सामना  पाकिस्तान आणि यूएसए यांच्यात खेळला जात आहे. कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात नाणेफेक गामवणाऱ्या पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करत  साहिबजादा फरहान अर्धशतकाच्या जोरावर ९ गडी गमावून  १९० धावा केल्या आहेत. यूएसए संघाला विजयासाठी १९१ धावा कराव्या लागणार आहेत. यूएसएकडून शेडली व्हॅन शाल्कविकने सर्वाधिक ४  विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : NZ vs UAE, T-20 World Cup : सेफर्ट आणि फिन ऍलनसमोर UAE धाराशाही! टी-२० विश्वचषकात न्यूझीलंड 10 विकेट्सने सर्वात मोठा विजय

यूएसए संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. पाकिस्तानने डावाची सुरुवात चांगली झाली. सैम अय्युब आणि साहिबजादा फरहान या सलामीविरांनी पहिल्या विकेट्ससाठी ५४ धावांची भागीदारी रचली. परंतु, त्यानंतर सैम अय्युब १७ चेंडूत १९ धावा करून बाद झाला. त्यानंतर संघाचा कर्णधार सलमान अली आघा झटपट बाद झाला. तो १ धावा करून बाद झाला. त्यानंतर बाबर आझम मैदानात आला. फरहान आणि बाबर आझम यांनी शानदार फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. या दोघांनी ११९ धावांची भागीदारी रचली. या भागीदारी दरम्यान साहिबजादा फरहानने आपले अर्धशतक पूर्ण केले. बाबर आझम चांगल्या लयीत दिसत होता परंतु, तो ३२ चेंडूत ४६ धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने ४ चौकार आणि १ षटकार मारला.

बाबर बाद झाल्यावर संघाचा सेट फलंदाज साहिबजादा फरहान देखील बाद झाला. त्याने ४१ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७३ धावांची महत्वपूर्ण खेळी खेळली. त्यानंतर शादाब खानने आक्रमक खेळी केली. तो १२ चेंडूत ३० धावा करून बाद झाला. त्याने कहा चौकार आणि एक षटकार मारला. फहीम अश्रफ १ धावा, उस्मान खान ० धावा, अबरार अहमद ० धावा करून बाद झाले. तर शाहीन आफ्रिदी  ९ धावांवर नाबाद राहिला. यूएसएकडून शेडली व्हॅन शाल्कविकने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर सौरभ नेत्रावलकर, मोहम्मद मोहसीन आणि  हरमीत सिंगने प्रत्येकी १ विकेट्स घेतली.

हेही वाचा : NAM vs NED, T20 World Cup 2026 : नेदरलँड्सने नामिबियाला 7 विकेट्सने चारली धूळ! बास डी लीडेची स्फोटक खेळी

दोन्ही संघ खालीलप्रमाणे 

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : सैम अय्युब, साहिबजादा फरहान, सलमान आगा (क), बाबर आझम, उस्मान खान (डब्ल्यू), शादाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, उस्मान तारिक, अबरार अहमद

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका प्लेइंग इलेव्हन: अँड्रिज गॉस (डब्ल्यू), शायन जहांगीर, मोनांक पटेल (क), मिलिंद कुमार, संजय कृष्णमूर्ती, शुभम रांजणे, हरमीत सिंग, मोहम्मद मोहसीन, शेडली व्हॅन शाल्कविक, एहसान आदिल,

Web Title: Pak vs usa t20 world cup pakistan set a target of 191 runs against us

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • Babar Azam
  • PAK vs USA
  • Sahibzada Farhan
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Abhishek Sharma लागोपाठ 3 वेळा शून्यावर बाद, Best Friend शुभमनला केला मेसेज; काय झाले बोलणे केला खुलासा
1

Abhishek Sharma लागोपाठ 3 वेळा शून्यावर बाद, Best Friend शुभमनला केला मेसेज; काय झाले बोलणे केला खुलासा

बाबर आझम आणि फखर जमान यांनी पाकिस्तानशी केली गद्दारी, तपासात धक्कादायक खुलासे! वाचा संपूर्ण प्रकरण
2

बाबर आझम आणि फखर जमान यांनी पाकिस्तानशी केली गद्दारी, तपासात धक्कादायक खुलासे! वाचा संपूर्ण प्रकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.