देशात कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा डोके वर काढले आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही वाढणारी रुग्णसंख्या आरोग्य मंत्रालयाची चिंत वाढवणारी ठरतेय. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 10,093 रुग्ण आढळले आहेत. तर, 23 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण मृतांची संख्या 5,31,114 वर पोहोचली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 53,720 वर गेली आहे. शनिवारी 10,753 तर, शुक्रवारी 11,109, गुरुवारी 10,158 रुग्णांची नोंद करण्यात आली आली होती.
[read_also content=”घराशेजारी असलेल्या लाकूड डेपोला लागली आग, बघता बघता घरालाही घेतलं कवेत, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू https://www.navarashtra.com/india/three-people-from-same-family-died-after-a-fire-braeks-out-near-their-house-in-hyderabad-nrps-385690.html”]
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 57,542 वर पोहोचली आहे, जी एकूण रुग्णसंख्येच्या 0.13 टक्के आहे. देशात गेल्या 24 तासांत 6,248 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यांत 4,42,29,459 जणांना रुग्णालयातुन डिस्चार्ज मिळाला आहे, तर रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.68 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 807 जणांना कोरोना लस देण्यात आली असुन राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 220.66 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.