Indian team creates history in Kanpur Test A place in the WTC finals is assured with a second win
IND vs BAN 2nd Test : कानपूर टेस्टमध्ये अनेक विक्रम झाले. पावसाने जवळजवळ अनिर्णित होणारा सामना भारतीय संघाने आपल्या बाजूने खेचून आणला. तब्बल अडीच दिवसांचा खेळ रद्द झाल्यानंतर दुसरी टेस्ट मॅच जवळजवळ ड्राॅ होणार असेच चिन्ह दिसू लागले होते. परंतु, चौथ्या दिवशी भगवान सूर्याची कृपा झाली, नंतर चक्क सूर्यप्रकाशात मॅच सुरू झाली अन् भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. बांगलादेशला अवघ्या 233 धावांवर रोखले. त्यानंतर भारताने 285 धावांवर डाव घोषित केला. कानपूर कसोटी जिंकण्यासाठी भारतासमोर 95 धावांचे लक्ष्य होते.
भारताचा सलग दुसरा विजय, रोहित शर्माचे अफलातून निर्णय
Captain @ImRo45 collects the @IDFCFIRSTBank Trophy from BCCI Vice President Mr. @ShuklaRajiv 👏👏#TeamIndia complete a 2⃣-0⃣ series victory in Kanpur 🙌
Scorecard – https://t.co/JBVX2gyyPf#INDvBAN pic.twitter.com/Wrv3iNfVDz
— BCCI (@BCCI) October 1, 2024
बांगलादेशची फलंदाजी ढासळली
बांगलादेशने 107 धावांवर सामना सुरू केला परंतु बांगलादेशची फलंदाजी ढासळली. भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांचे कबंरडे मोडले. बुमराह, आकाश दीप, रवींद्र जडेजाने यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या. बुमराहने 3 विकेट घेतल्या. त्यानंतर भारतीय संघाने दमदार फलंदाजी करीत 285 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर बांगलादेशला फलंदाजीला आमंत्रित केले.
बांगलादेशची फलंदाजी दुसऱ्या इनिंगमध्येसुद्धा कमालीची ढासळली, भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा बांगलादेशच्या फलंदाजांना रोखण्यात यश मिळवले. बुमराह, अश्विन, रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. अश्विनने कर्णधार रोहित शर्माच्या अपेक्षेनुसार विकेटची सुरुवात केली. त्याच्याच गोलंदाजीवर रीघ ओढत बुमराहने विकेट घेतल्या आणि बांगलादेशला अवघ्या 146 धावांवर रोखले. त्यानंतर भारतासमोर अवघे 98 धावांचे लक्ष्य होते. भारतीय फलंदाजांनी हे लक्ष्य लिलया पार करीत टेस्टमध्ये बांगलादेशला क्लिन स्वीप दिली. भारतीय संघाने कानपूर कसोटीत बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने 2 सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली.
गुणतालिकेतील भारताचे स्थान
भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाने सलग दोन टेस्ट विजयासह 74.24 गुण मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. भारताने 11 सामन्यात दोन पराजय, एक सामना अनिर्णित सामन्यासह 8 विजय मिळवले आहेत. भारताने सलग 6 विजय मिळवले आहेत. त्यामुळे टीम इंडियाने सर्वाधिक गुण प्राप्त करीत गुणतालिकेत अव्लल स्थान गाठले आहे. आॅस्ट्रेलियाने 12 सामने खेळत 3 पराजय, 1 ड्राॅ आणि 8 विजयासह 62.50 गुण मिळवत गुणतालिकेत द्वितीय स्थान पटकावले आहे. त्यानंतर श्रीलंकेचा नंबर आहे श्रीलंकेने 9 सामन्यात 5 विजय आणि 4 पराजयासह 55.56 गुण मिळवत तृतीय स्थान पटकावले आहे.
आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत अव्वल
या विजयासह भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेतेपदासाठी पात्र होण्याच्या जवळ पोहोचला आहे. 11 सामन्यांमधला हा त्याचा 8वा विजय असून गुणतालिकेत तो अव्वल स्थानावर आहे. यानंतर भारताला न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची मायदेशातील मालिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यामुळे ते न्यूझीलंडविरुद्ध सहज विजय मिळवतील, असे मानले जात आहे.
कानपूरमध्ये बांगलादेशने गुडघे टेकले
भारतीय संघाने कानपूरमध्ये बांगलादेशला गुडघे टेकले. भारतीय संघाला भारतात पराभूत करण्याचे स्वप्न घेऊन आलेला कर्णधार नजमुल हुसेन शांतोचा संघ चांगलाच कोलमडला. पावसामुळे अडीच दिवसांहून अधिक दिवसांचा खेळ वाया गेला, पण रोहित शर्माच्या आक्रमक डावपेचांमुळे कसोटी टी-२० सारखी रोमांचक झाली. भारतीय संघाने बांगलादेशला दुसऱ्या डावात 146 धावांत गुंडाळले तेव्हा त्यांना 95 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी 3 विकेट गमावून सहज गाठले. त्याच्यासाठी यशस्वी जैस्वालने 51 धावांची खेळी खेळली, तर विराट कोहलीने नाबाद 29 धावा केल्या आणि पंत 4 नाबाद धावा करून परतला.
रोहित शर्मा आणि शुभमन गिल स्वस्तात बाद
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला सुरुवातीच्या काळात पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार रोहित शर्माला आक्रमक पध्दत घ्यायची होती, पण केवळ 2 धावा करून तो बाद झाला. यानंतर शुभमन गिल 6 धावांवर बाद झाला. या दोन्ही विकेट मेहदी हसन मिराजच्या खात्यात गेल्या. भारत विजयापासून 3 धावा दूर असताना यशस्वी जैस्वाल हवेत चेंडू खेळून 45 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 51 धावा करून बाद झाली. विराटने नाबाद 29 आणि पंतने नाबाद 4 धावा केल्या.
सामन्यात एकूण 173.2 षटके खेळली जातात, तर एका दिवसात 90 षटके असतात.
दुसऱ्या टेस्टमध्ये दोन्ही संघांचा खेळ
बांगलादेश संघाचा पहिला डाव : २३३-१० (७४.२ षटके)
भारतीय संघाचा पहिला डाव : २८५-९ ड (३४.४ षटके)
बांगलादेश संघाचा दुसरा डाव : 146-10 (47 षटके)
भारतीय संघाचा दुसरा डाव : ९८-३ (१७.२ षटके)
अवघ्या काही षटकांत भारताने खेळ पलटवला
तत्पूर्वी, दुसऱ्या आणि अंतिम क्रिकेट कसोटीच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी उपाहारापर्यंत भारताने पाहुण्या संघाला दुसऱ्या डावात 146 धावांत गुंडाळले. पहिल्या डावात ५२ धावांची आघाडी घेतलेल्या भारताला आता बांगलादेशविरुद्ध विजयासाठी उर्वरित दोन सत्रात ९५ धावांची गरज होती. भारताकडून जडेजा (34 धावांत तीन विकेट), जसप्रीत बुमराह (17 धावांत तीन विकेट) आणि रविचंद्रन अश्विन (50 धावांत तीन विकेट) यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर आकाश दीप (20 धावांत एक विकेट) यांनी एक विकेट घेतली .