Rohit Sharma hit a sky-high six
कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीसाठी मैदानात येताच त्याने त्याचा रुद्रावतार दाखवला. 2023 च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकानंतर रोहित प्रथमच एकदिवसीय सामन्यात खेळण्यासाठी मैदानावर आला होता. कोलंबोच्या आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर यजमान श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 230 धावा केल्या.
दुसऱ्याच चेंडूवर रोहित शर्माचा तुफानी छक्का
Hitman goes 💥 right from the go!
A massive six by Rohit to get India off to a flying start 🇮🇳
Watch #SLvIND LIVE NOW on #SonyLIV 🍿 pic.twitter.com/sVxICPQuWX
— Sony LIV (@SonyLIV) August 2, 2024
231 धावांचे लक्ष्य गाठताना भारतीय संघाची धमाकेदार सुरुवात
Captain 🤝 Vice-captain
A quickfire 5⃣0⃣-run stand ✅ ✅
Follow the Match ▶️ https://t.co/4fYsNEzO5N#TeamIndia | #SLvIND | @ImRo45 | @ShubmanGill pic.twitter.com/cx55xTn4uX
— BCCI (@BCCI) August 2, 2024
दुसऱ्याच चेंडूवर सिक्सर
भारतीय संघ 231 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरली. सलामीला यावेळी कर्णधार रोहित शर्मासह शुभमन गिल होता. सलामीला आलेल्या रोहित शर्माने श्रीलंकेच्या असिथा फर्नांडोनेच्या दुसऱ्या चेंडूवर एक उत्तुंग षटकार ठोकत इंडियाची धमाकेदार सुरुवात केली. गोलंदाजीत असिथा फर्नांडोने श्रीलंकेसाठी पहिले षटक टाकले. त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये दुसऱ्या चेंडूवर रोहितचा धमाकेदार छक्का पाहून असिथादेखील चक्रावला.
असिथा फर्नांडोसुद्धा चक्रावला
रोहित शर्माने असिताच्या पहिल्या चेंडूला पूर्ण आदर दिला, पण पुढच्या चेंडूवर त्याने पुढे जाऊन जोरदार षटकार ठोकला. रोहित शर्माची ही वृत्ती पाहून आसिथा फर्नांडोला धक्काच बसला. रोहित शर्माचा हा फटका इतका जबरदस्त होता की तो चेंडूकडे पाहण्यासाठीही वळला नाही. अशातच रोहित शर्माने सिक्ससह आपले खाते उघडले.
श्रीलंकेने दिलेल्या 231 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने तुफानी शैलीत फलंदाजी करत मोठा विक्रम केला. रोहित आणि शुभमन यांनी एकदिवसीय सामन्यात भारतासाठी 24व्यांदा 50 किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम केला आहे. यापैकी या दोघांमध्ये 5 वेळा 100 किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी झाली.