Live updates of India vs Zimbabwe 3rd T20 match
India vs Zimbabwe 3rd T20I LIVE Score : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील T20 मालिकेतील तिसरा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मैदानावरील पहिला सामना झिम्बाब्वेने १३ धावांनी जिंकला. भारताने पुनरागमन करीत दुसरा सामना 100 धावांनी जिंकला. या 5 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना जिंकणाऱ्या संघाला मालिकेत आघाडी घेण्याची संधी आहे. या सामन्यातून वर्ल्ड चॅम्पियन संघाचा भाग असलेले यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे आणि संजू सॅमसनदेखील टीम इंडियात पुनरागमन करीत आहेत.
भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवले 183 धावांचे लक्ष्य
Innings Break!
Captain @ShubmanGill top-scores with 66(49) as #TeamIndia post 182/4 in the first innings 💪
Over to our bowlers 🙌
Scorecard ▶️ https://t.co/FiBMpdYQbc#ZIMvIND pic.twitter.com/6q46FzzkgP
— BCCI (@BCCI) July 10, 2024
भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने दमदार 66 धावा ठोकल्या त्याला ऋतुराजने चांगली साथ दिली. भारताने 20 ओव्हरमध्ये 182 धावा केल्या. झिम्बाब्वे 183 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरली खरी परंतु त्यांना अवघ्या 159 धावांवरच रोखण्यात आल्याने ही भारताने या मालिकेत 2-1 ने घेतली आघाडी.
10 Jul 2024 07:48 PM (IST)
भारताने दिलेले 183 धावांचे लक्ष्य गाठताना झिम्बाब्वेची पुरती दाणादाण उडाली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी झिम्बाब्वेच्या फलंदाजांना पुरते जखडून ठेवत 159 धावांवरच रोखले. पॉवर प्लेमध्येच झिम्बाब्वेच्या 5 विकेट गेल्या होत्या. त्यामुळे येणाऱ्या फलंदाजांसाठी मोठ्या परीक्षेची गोष्ट होती.
10 Jul 2024 06:58 PM (IST)
भारताने दिलेले लक्ष्य गाठताना झिम्बाब्वेची दाणादाण उडाली. झिम्बाब्वेचा निम्मा संघ 50 धावांच्या आत तंबूत परतला. भारतीय संघाने झिम्बाब्वेची दाणादाण उडवली. एकही फलंदाज 20 धावांपर्यंत पोहचू शकला नाही.