फोटो सौजन्य: Instagram
नुकतेच भारत-झिम्बावेच्या पहिल्या सामन्यात भारताला झिबवेकडून पराभवाचा स्वीकार करावा लागला होता परंतु आज दुसऱ्या सामन्यात भारतने झिम्बावेचा १०० धावांनी धुव्वा उडवून टाकला आहे. या विजयात अभिषेक शर्मा व ऋतुराज गायकवाडच्या फलंदाजीचा सिंहाचा वाटा आहे. दोघांनी उत्तम रित्या फलंदाजी केल्यामुळे भारत आज १०० धावांनी जिंकू शकला आहे.
या सामन्यात अभिषेक शर्माने ४७ चेंडूत शतक ठोकले होते. तर दुसरीकडे ऋतुराजने ४७ चेंडूत ७७ धाव आपल्या नावावर केल्या होत्या. तसेच या दोघांना साथ म्हणून रिंकू सिंगने सुद्धा आपल्या फलंदाजीची जादू प्रेक्षकांना दाखवून दिली. त्याने २२ चेंडूत ४८ धावा बनवल्या होत्या. या सर्वांच्या जबरदस्त फलंदाजीमुळे भारताने झिम्बावेला २३४ चा टार्गेट दिला होता.
या झिम्बावेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सुद्धा उत्तम कामगिरी केली. मुकेश कुमार, रवी बिष्णोई, आवेश खान व वॉशिंग्टन सुंदरच्या गुगली गोलंदाजीने झिम्बाब्वेचा संघ १८.४ षटकात १३४ धावांवर गडगडला.