अचलपूर (Achalpur). ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे बिहाली हे मेळघाटातील (Melghat) गाव टॅंकरमुक्त झाले आहे. यामुळे मागील अनेक वर्षांपासून गावकऱ्यांना सतावणारा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला असून गावातील विहीरी भर उन्हाळ्यातही पाण्याने तुडूंब भरलेल्या आहेत.
[read_also content=”पीककर्ज मिळविण्यासाठी धडपड ! खासगी बॅंकांच्या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची कर्जवाटपाची गती अधिक ; तरीही शेतकऱ्यांना सतावतेय पीककर्जाची चिंता https://www.navarashtra.com/latest-news/the-speed-of-disbursement-of-district-central-co-operative-banks-is-higher-than-that-of-private-banks-still-farmers-are-worried-about-crop-loans-nrat-129804.html”]
चिखलदरा तालुक्यातील बिहाली गावात भर पावसाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत असे. गावात पाणीपुरवठा योजना नाही, पाण्याचे नैसर्गिक स्रोत मर्यादित असल्याने या गावातील पाणीटंचाई पाचवीला पुजलेली होती. चिखलदऱ्यापासून केवळ 30 किलोमीटर अंतरावरील या गावाच्या पाणीटंचाईवर जिल्हा प्रशासनाला टॅंकरने पाणीपुरवठा करण्याखेरीज दुसरा कुठलाच प्रभावी पर्याय सापडू शकला नाही. मात्र दररोज टॅंकरच्या दोन-तीन खेपा पाणी घेण्यावरून होणारे भांडणतंटे आणि एकूणच पाण्याची कमतरता ग्रामस्थांनाही अंगवळणी पडली होती. त्यामुळे गावकऱ्यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील मृत पावलेल्या विहिरींना जिवंत करून संजीवनी देण्यात आली.
परिणामी परिसरातील विहिरींचे झरे वाहू लागले आहेत. अनेक वर्षांपूर्वी गुळण्या मारत आटलेल्या विविध विहिरी पुन्हा जिवंत झाल्या आहेत. त्यामुळे आता ग्रामस्थांना टॅंकरची वाट न पाहता गावातच पाणी उपलब्ध होऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.