Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded News : नायगावच्या गावकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले! पाणीपट्टी थकबाकीमुळे नगरपंचायतीने पुरवठा केला बंद

सुमारे ३० लाख रुपयांच्या पाणीपट्टी थकबाकीमुळे सलग चौथ्या दिवशी पाणीपुरवठा ठप्प झाला असून जिगळा तळ्यावर सील ठोकताच शहराचा मुख्य पाणीस्त्रोत बंद पडला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 04, 2026 | 04:48 PM
Naigaon Nagar Panchayat shuts off water for four days due to water bill arrears Nanded News

Naigaon Nagar Panchayat shuts off water for four days due to water bill arrears Nanded News

Follow Us
Follow Us:

Nanded News : नागेश कल्याण : नायगाव : मार्च महिना सुरू झाला असून होळी-धुळवड साजरी होत आहे, गुढीपाडवा उंबरठ्यावर येवून ठेपला असताना नायगाव शहरात पाण्याचा थेंबही नळातून पडत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सलग चौथ्या दिवशी पाणीपुरवठा ठप्प झाला असून जिगळा तळ्यावर सील ठोकताच शहराचा मुख्य पाणीस्त्रोत बंद पडला आणि प्रशासनाच्या कारभाराचा फटका थेट जनतेला बसला. (Nanded News)

नगरपंचायतीकडील सुमारे ३० लाख रुपयांच्या पाणीपट्टी थकबाकीमुळे ही कारवाई करण्यात आली. मात्र या निर्णयाचा परिणाम थेट नागरिकांवर झाला. सणासुदीच्या दिवसांत घरगुती कामे, धार्मिक विधी आणि पाहुणचारासाठी पाण्याची मोठी गरज असताना नागरिकांना विहिरी, बोअरवेल आणि खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

३० लाख आमचे, १.८० कोटी नागरिकांचेः चव्हाण

नायगाव नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष विजय चव्हाण यांनी दैनिक नवराष्ट्रशी बोलताना प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली, नगरपंचायतीकडे ३० लाख रुपयांची थकबाकी आहे; मात्र शहरवासीयांकडूनच तब्बल १ कोटी ८० लाख रुपयांची पाणीपट्टी बाकी आहे. कर वसुलीसाठी आम्ही सक्ती करत नाही. सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ३० लाखांची थकबाकी ही ग्रामपंचायत काळापासून प्रलंबित आहे, असे त्यांनी सांगितले. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये, म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. एक-दोन दिवसांत परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी हालचाली सुरू आहेत, असा दावा त्यांनी केला. नगर प्रशासनाची बदनामी करण्यासाठी विरोधक मुद्दाम वातावरण तापवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हे देखील वाचा : अजित पवारांच्या अपघाताला नवे वळण! घटनेपूर्वी बारामती विमान तळाची रेकी? आमदार रोहित पवार यांचा धक्कादायक दावा

विरोधकांनी उठवली टीकेची झोड

या पाणीप्रश्नावरून सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांकडून सोशल मीडियावर आरोपांचे ‘वॉर’ सुरू झाले आहेत.
एकीकडे नगर प्रशासनाच्या निर्षक्रयता, आर्थिक गैरव्यवस्थापन आणि राजकीय हेतुपुरस्सर बदनामीचे आरोप जोरदारपणे होत आहेत तर दुसरीकडे नायगावकरांचे नळ मात्र कोरडेच आहेत. याची चिंता नागरिक करत आहेत.
काही भागांत टैंकर दरात मनमानी वाढ झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. “आर्थिक गोंधळाची शिक्षा आम्ही का भोगायची?” असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

हे देखील वाचा : विनोद तावडेंना मिळालं प्रामाणिक पणाचं गिफ्ट! राज्यसभेवर संधी मिळताच व्यक्त केल्या भावना

पाळज येथे डिजिटल रूम फोडली; जिल्हा परिषदच्या हायस्कूलमध्ये चोरी

नांदेड (वा.) भोकर तालुक्यातील पाळज येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये अज्ञात चोरट्याने डिजिटल रूमचे कुलूप तोडून सोलार यूपीएस इन्व्हर्टर व बॅटरी असा सुमारे ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना घडली आहे. ही घटना २६ फेब्रुवारी रोजी पहाटे घडली.
चोरट्याने शाळेतील डिजिटल रूमच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व तेथील लिव्हगार्ड कंपनीचा सोलार यूपीएस इन्व्हर्टर व बॅटरी चोरी करून नेली. याप्रकरणी जि.प. हायस्कूल पाळज येथील मुख्याध्यापक प्रशांत विलासराव पत्तेवाट (वय ५५ वर्षे) यांनी भोकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञाता आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्षटवास हे करीत आहेत.

Web Title: Naigaon nagar panchayat shuts off water for four days due to water bill arrears nanded news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • daily news
  • nanded news
  • Water Shortage

संबंधित बातम्या

विद्यार्थ्याचे अपहरण करून लुटले, पोलिसांकडून टोळीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना घेतले ताब्यात
1

विद्यार्थ्याचे अपहरण करून लुटले, पोलिसांकडून टोळीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना घेतले ताब्यात

नांदेडचे शिक्षक सुनील मोरे आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर; आधी मुलांची धारदार शस्त्रांनी हत्या केली अन् नंतर…
2

नांदेडचे शिक्षक सुनील मोरे आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर; आधी मुलांची धारदार शस्त्रांनी हत्या केली अन् नंतर…

‘मी माझ्या मुलांसह आत्महत्या करतोय…’; वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या, स्टेटस ठेवलं अन्…
3

‘मी माझ्या मुलांसह आत्महत्या करतोय…’; वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या, स्टेटस ठेवलं अन्…

Mumbai Water Shortage : मुंबईकरांची वाढली धाकधूक; सातही तलावांतील पाणीपातळी घसरली
4

Mumbai Water Shortage : मुंबईकरांची वाढली धाकधूक; सातही तलावांतील पाणीपातळी घसरली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.