gold and silver
तेलंगाणाची राजधानी हैदराबादमध्ये सोन (Gold ATM)) काढण्याचं एटीएम मशीन काढण्यात सुरू करण्यात आलं आहे. हा देशातील पहिलचं एटीएम ज्यामधून सोन्याचे शिक्के निघतात. या बातमी नंतर जगात उपलब्ध असलेलं सोन याबाबत चर्चा सुरु झाली. एकीकडे सोन्याच्या बाबतीत असे नवे नवे प्रयोग केले जात असताना सोन्याच्या बाबतीत काहीशी चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. पृथ्वीवरुन सोनं दिवसेंदिवस कमी होत असल्याचं निर्दशनास येत आहे.
[read_also content=”मोदींविरोधात वक्तव्य करणं भोवलं, काँग्रेस नेते राजा पटेरीयांना अटक https://www.navarashtra.com/india/congress-leader-raja-pateria-arrested-for-controversial-statemnet-about-pm-modi-nrps-353168.html”]
सोनेच्या विक्रीत चीन देश पहिल्या क्रमांकावर आहे तर भारत दुसऱ्या क्रमांकावर. आपल्या देशात सोनं मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यत येत. जन्मापासून ते लग्न समारंभ अशा अनेक वेळी सोनं खरेदी करण्यात येतं. मात्र जगभरातून हे सोनं लवकरच संपण्याच्या मार्गावर आहे. याच कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं सोन्याचं उत्खनन. ज्या प्रमाणे जगभरात सोन्याचं उत्खनन करण्यात येत होतं त्याचप्रमाणे सोन्याच प्रमाण कमी होतं गेलं. अमेरिकेच्या एका भौगोलिक सर्वेनुसार आतापर्यंत जगभरातून 2 लाख टन सोन्याचं उत्खनन करण्यात आलं आहे. आणि आता फक्त 50000 टन शिल्लक राहिलं आहे. जे येत्या 20 वर्षात संपणार. जर पृथ्वीवरुन सोनं संपल तर काय होणार कधी विचार केल आहे का?
रिपोर्टनुसार, सोनं संपायच्या मार्गावर आल्यास नेमंक काय होणार याचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर काय परिणाम होणार असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेलच. आता पृथ्वीवरुन सोनं कमी होणार म्हणजे परिणामी सोन्याचा तुटवडा निर्माण होणार. आणि त्यामुळे सोन्याच्या किंमतींवर त्याचा थेट परिणाम होणार. सोन्याचे भाव वाढणार त्यामुळे सामान्या माणसाच्या खिशाला ते परवडणारं नसणार. मात्र, यावरही शास्त्रज्ञांनी उपाय शोधून काढला आहे.
ऐकायला जरी विचित्र वाटतं असल तरी हे खरं आहे. नव्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन आता थेट अंतराळात सोन्याचा शोध घेतला जाणार आहे. शास्त्रज्ञांनी याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांना अंतराळात एक अशाप्रकारचं एका लघुग्रहाचा शोध लागलाय ज्यामधून सोनं मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या लघुग्रहाचं नाव 16 सायकी आहे. गुरु आणि मंगळ ग्रहाच्या मध्ये असलेल्या हा लघुग्रह सोनं, प्लॅटिनम, निकल आणि आयरन पासून बनलेला असून तो जवळपास 225 किमी रुंद आहे. आणि नासाने सांगितल्यानुसार, यामध्ये असलेल्या धातूंची किंमत सुमारे 8000 क्वाॅड्रिलियान पाउंड सोनं आहे. मात्र या सोन्याचा शोध घेण्यासाठी आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अतंराळ यानाने जाण्यास सुमारे चार वर्षाचा कालावधी लागू शकतो. यासाठी नासाच्या वतीने आता पाऊलं उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी नासाच्या (NASA) वतीने मिशन सुरू करण्याच्याा दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे आता येत्या काही काळात पृथ्वीवरुन नाही तर अतंराळातून सोनं मिळू शकणार यात शंका नाही.