Zaheer Khan ready to replace Gautam Gambhir
Zaheer Khan IPL 2025 : लखनऊ सुपर जायंट्स IPLच्या मेगा लिलावापूर्वी भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानला संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्त करणार आहे. ४५ वर्षीय झहीर खान दोन वर्षांनी IPLमध्ये परतणार आहेत. तो 2018 ते 2022 दरम्यान पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सशी संबंधित होता. सूत्रांनी सांगितले की, ‘झहीरला संघाचा मार्गदर्शक करण्यात आला आहे, त्याची घोषणा आज संध्याकाळी केली जाणार आहे.’
झहीर खान घेणार गौतम गंभीरची जागा
गौतम गंभीरच्या जाण्याने लखनऊ संघात हे पद रिक्त आहे. गंभीर 2024 IPL जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामील झाला होता. आता गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. झहीर हा मुंबई इंडियन्सचा क्रिकेट संचालक होता आणि नंतर तो जागतिक विकासाचा प्रमुख बनला. लखनऊ संघाला सध्या गोलंदाजी प्रशिक्षक नाही. दक्षिण आफ्रिकेचा मॉर्न मॉर्केल संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता, जो आता गंभीरसह भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील झाला आहे.
झहीर खान आतापर्यंत तीन संघांसाठी खेळलाय
झहीरने मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी आयपीएल खेळला असून या संघांसाठी 100 सामन्यांत 102 विकेट्स घेतल्या आहेत. 2017 मध्ये तो दिल्ली संघाचा कर्णधार असताना शेवटचा आयपीएल खेळला होता. लखनऊ संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आहेत तर लान्स क्लुसनर आणि ॲडम व्होजेस हे सहाय्यक प्रशिक्षक आहेत.
झहीर खानची टी-20 सामन्यातील कारकीर्द
T-20 आंतरराष्ट्रीय विक्रम किती आहे, 46 वर्षीय झहीर खानने भारतासाठी 17 T-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 17 विकेट घेतल्या आहेत. 2006 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला तेव्हा झहीर खान त्या संघाचा एक भाग होता. झहीर खानने एक चेंडू शिल्लक असताना भारताच्या सहा विकेट्सने विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. चार षटकांच्या कोट्यात त्याने केवळ 15 धावा देताना दोन्ही सलामीवीरांना बाद केले.