नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रविवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात इशान किशनच्या एका झेलने खळबळ उडाली आहे. या सामन्यात निकोलस पूरन टीम इंडियाच्या जबड्यातून विजय हिसकावण्याचा प्रयत्न करत होता, पण इशान किशनने लांब डाईव्ह घेताना निकोलस पूरनचा कॅच टिपला. या सामन्यात भारताला पुनरागमन करण्यात यश आले. भारताने हा सामना १७ धावांनी जिंकला.
कॅरेबियन डावाच्या १८व्या षटकात कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीची जबाबदारी शार्दुल ठाकूरकडे सोपवली. शार्दुल ठाकूरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर निकोलस पूरनने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चूक केली. त्यानंतर विकेट्सच्या मागे उभ्या असलेल्या इशान किशनने चेंडूच्या दिशेने धाव घेतली आणि शेवटी डायव्ह मारताना हा शानदार कॅच घेतला.
#IshanKishan that’s fantabulous catch! #India got the dangerous man!
Come on #TeamIndia ?????#INDvWI #INDvsWI #WIvIND #WIvsIND #Cricke pic.twitter.com/JxfEXYjFuF— BlueCap ?? (@IndianzCricket) February 20, 2022
वेस्ट इंडिजच्या खेळाडूने डग आऊटमध्ये जाऊन लज्जास्पद कृत्य केले
जेव्हा जेव्हा भारतीय संघ अडचणीत असतो तेव्हा शार्दुल ठाकूरला चेंडू दिला जातो आणि शार्दुलने ते कामही थोडे सोपे केले. निकोलन पूरन बाद झाला तेव्हा १७.१ षटकांनंतर वेस्ट इंडिजची धावसंख्या १४७ धावा होती. वेस्ट इंडिजला विजयासाठी अवघ्या १७ चेंडूत ३८ धावांची गरज होती. निकोलस ज्या फॉर्ममध्ये होता, ते पाहता त्याच्यात सामना फिरवण्याची ताकद आहे, असे म्हणणे अजिबात अवघड नाही.
ईशान किशनसाठी तिसरा टी२० खूप आत्मविश्वास देणारा ठरला आहे. दोन सामन्यांत धावा काढू न शकलेल्या किशनने या सामन्यातही फलंदाजीचे योगदान दिले आणि निकोलस पूरनच्या या अवघड झेलवर शानदार डाईव्ह मारत भारताला या सामन्यात पुनरागमन केले. निकोलस पूरनने या सामन्यात ४७ चेंडूत ६१ धावा केल्या. या खेळीत त्याने ८ चौकार आणि १ षटकार लगावला. आऊट झाल्यानंतर निकोलस पूरनने कॅमेऱ्यासमोर आपला राग व्यक्त केला.
भारतीय संघाने तीन सामन्यांची टी-२० मालिका ३-० अशी जिंकली
या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय संघाने १८४ धावा केल्या. भारतीय संघाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघ केवळ १६७ धावा करू शकला आणि सामना १७ धावांनी गमावला. त्यानंतर भारतीय संघाने तीन सामन्यांची टी-२० मालिका ३-० ने जिंकली.