चेन्नई : मानवानंतर, कोरोना विषाणूमुळे प्राण्यांचा देखील मृत्यू होण्यास सुरुवात झाली आहे. चेन्नईला लागून असलेल्या वंदलूरमधील अरिग्नार अण्णा प्राणीशास्त्रविषयक उद्यानात संसर्गामुळे ९ वर्षांच्या नीला सिंहिणीचा ३ जून रोजी सायंकाळी अंदाजे ६.१५ वाजता मृत्यू झाला. नीलाला लक्षणे दिसत होती आणि तिच्या नाकातून थोडासा स्त्राव एक दिवस आधी पाहण्यात आला होता.
सिंह आणि वाघांमध्ये कोरोना संक्रमण पहिल्यांदा बार्सिलोना (स्पेन) आणि अमेरिकेतील ब्रोंक्स प्राणिसंग्रहालयात आढळून आले. भारतात सिंहामध्ये कोरोना संक्रमणाचे पहिले प्रकरण हैदराबाद येथे आढळून आले होते. येथे ८ सिंहांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ६ मे रोजी उत्तर प्रदेशातील इटावा प्राणिसंग्रहातील एका सिंहाला कोरोनाचा संसर्ग झाला होता.
इतकेच नाही तर ११ पैकी ९ सिंहांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. भोपाळमध्ये त्यांच्या विष्ठा आणि स्वॅबचीही तपासणी केली गेली. तथापि, त्यांचे नमुने पुढील तपासणीची पुष्टी करण्यासाठी शुक्रवारी भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (बरेली) आणि सेल्युलर अणि आण्विक जीवशास्त्र (हैदराबाद) केंद्रात पाठविण्यात आले आहेत. सध्या सर्व सिंह वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवले आहेत.
अहवालानुसार सिंह आणि वाघांमध्ये कोरोना संसर्ग प्रथम बार्सिलोना (स्पेन) आणि अमेरिकेतील ब्रोंक्स प्राणिसंग्रहालयात आढळला.
[read_also content=”देशात कोरोनाची दुसरी लाट का आली? काय आहे नेमका हा ‘डेल्टा व्हेरियंट’? https://www.navarashtra.com/latest-news/why-did-the-second-wave-of-corona-hit-the-country-what-exactly-is-this-delta-variant-138268.html”]
प्राणीसंग्रहालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, २६ मे रोजी संसर्गाची लक्षणे दिसली. सफारी पार्क परिसराच्या अॅनिमल हाऊस १ मध्ये ठेवलेल्या पाच सिंहांना एनोरेक्सिया (भूक न लागणे) आणि कधीकधी खोकल्याची लक्षणे आढळली. सिंहाचे रक्ताचे नमुने तामिळनाडू पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान विद्यापीठात (TANUVAS) पाठविले गेले आहेत.
त्याच वेळी, नाकातील स्वॅब, गुदाशयातील स्वॅब आणि ११ सिंहांच्या विष्ठेचे नमुने राष्ट्रीय उच्च सुरक्षा रोग संस्था, भोपाळ येथे पाठविण्यात आले आहेत. कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी अधिकृतरित्या नियुक्त केलेल्या संस्थांपैकी एक आहे. उद्यान प्राधिकरणाने सांगितले की येथे सर्व कर्मचार्यांना लस देण्यात आली आहे.
[read_also content=”कोविड रुग्णांना नकार, रुग्णालयांवर करा कारवाई; हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश https://www.navarashtra.com/latest-news/refuse-covid-patients-take-action-on-hospitals-high-court-directs-state-government-nrvk-138226.html”]
सिंहांमधील कोरोना संसर्गाची पहिली घटना हैदराबादमध्ये आढळली असून तेथे ८ सिंहांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. देशातील ही पहिली घटना आहे ज्यामध्ये प्राण्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग आढळून आला. काही दिवसांनंतर उत्तर प्रदेशमधील इटावाच्या प्राणिसंग्रहालयात एक सिंह संक्रमित झाल्याचे आढळले. दुसर्या सिंहातही लक्षणे आढळली.
भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेचे सहसंचालक डॉ. के. पी. सिंह यांच्या मते, इटावा सफारी पार्क येथे आरटी-पीसीआरसाठी १४ आशियातील सिंहाचे नमुने पाठविण्यात आले. ६ मे रोजी एका सिंहाचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर दुसर्यास संशयास्पद मानले गेले. उर्वरित १२ सिंहांचा अहवाल नकारात्मक असल्याचे दिसून आले.
lions also infected by corona in chennai zoo swab and stool samples were sent to bhopal