Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वैशाख पौर्णिमेला आलाय वर्षातल्या पहिल्या चंद्रग्रहणाचा योग, ग्रहण कुठे दिसणार हे जाणून घ्या

नासाच्या(Nasa) मते, २६ मे म्हणजे आज लोकांना आकाशात एक भिन्न दृश्य पहायला मिळेल. यात वर्षातील पहिले चंद्रग्रहण, सुपरमून (Supermoon) आणि तिसरे ब्लड मून(Blood Moon) असेल.

  • By साधना
Updated On: May 26, 2021 | 12:24 PM
lunar eclipse

lunar eclipse

Follow Us
Close
Follow Us:

या वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण(Lunar Eclipse 2021) आज बुधवार, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दुपारी ३-१५ ते सायं. ६-२३ या वेळेत होणार असून ते आपल्याला दिसणार नाही. मात्र या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने सुपरमूनचे दर्शन संपूर्ण भारतातून होणार असल्याचे समजते.

[read_also content=”अभिनेत्री आदिती द्रविडचा ९० वर्षाच्या आजीबरोबर ‘RICO RICO’ डान्स, तरूणांना लाजवेल असा उत्साह बघून तुम्हीही हैराण व्हाल! https://www.navarashtra.com/latest-news/actress-aaditi-dravid-dance-with-90-years-old-grandma-video-viral-on-social-media-nrst-134029.html”]

नासाच्या मते, २६ मे म्हणजे आज लोकांना आकाशात एक भिन्न दृश्य पहायला मिळेल. यात वर्षातील पहिले चंद्रग्रहण, सुपरमून आणि तिसरे ब्लड मून असेल.

चंद्रग्रहण अतिपूर्व ईशान्य भारतातून ओरिसातील पुरी, भुवनेश्वार, कटक, कोलकत्ता, आसाम, मिझोराम, मेघालय, नागालँड, अरुणाचल, मणिपूर आणि अंदमान निकोबार बेटे येथून दिसणार आहे. आपल्या इथे त्यावेळी चंद्र दृश्य आकाशात नसल्याने आपल्या इथून हे चंद्रग्रहण दिसणार नाही. तसेच हे चंद्रग्रहण चीन, जपान, कोरिया, थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिकेतील काही भाग येथून दिसणार आहे.

चंद्र हा पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार कि. मीटर अंतरावर आहे. पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर चंद्रबिंब १४ टक्के मोठे व ३० टक्के जास्त तेजस्वी दिसते. यावेळी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ ३ लक्ष ५७ हजार ३१० कि.मीटर अंतरावर येणार आहे. त्यामुळे तो मोठा व जास्त तेजस्वी दिसणार आहे. बुधवारी, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सायं. ७ वाजून १४ मिनिटांनी सुपरमून पूर्वेला उगवेल. रात्रभर आकाशात सुंदर, मनोहारी दर्शन देऊन उत्तररात्री ६ वाजून ३६ मिनिटांनी मावळेल.

पृथ्वीभोवती फिरता फिरता जेव्हा चंद्र पृ्थ्वीच्या जवळात जवळ बिंदूवर येतो, तेव्हा पौर्णिमेचा चंद्र नेहमीपेक्षा मोठा दिसतो. यालाच सुपरमून म्हणतात. जेव्हाजेव्हा चंद्र पृथ्वीपासून ३,६१,८८५ किलोमीटर किंवा त्याहून कमी अंतरावर असतो, तेव्हाच्या पौर्णिमेला सुपरमून दिसतो.

हे उपछाया चंद्रग्रहण आहे. जे उघड्या डोळ्यांनी स्पष्टपणे दिसू शकते. चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र सामान्य पौर्णिमेच्या चंद्रासारखा दिसतो. म्हणजेच पौर्णिमा चंद्र आणि उपछाया चंद्रग्रहणात काही फरक नाही. हे ग्रहण पाहण्यासाठी, विशेष उपकरणे आवश्यक आहेत.

चंद्र पृथ्वीच्या वास्तविक सावलीत न येता. तिच्या उपछायेतून बाहेर निघतो. तेव्हा उपछाया ग्रहण लागते. उपछाया ग्रहण प्रत्यक्ष चंद्रग्रहण मानले जात नाही. या ग्रहणकाळात चंद्राच्या रंग आणि आकारात कोणताही फरक नाही. चंद्रावर फक्त एक पुसट छाया दिसते. खगोलशास्त्रीय शास्त्रानुसार, चंद्र आणि सूर्यामध्ये पृथ्वी येते आणि सूर्यप्रकाशाच्या चंद्रावर पडत नाही तेव्हा प्रत्यक्ष ग्रहण येते. या घटनेस चंद्रग्रहण म्हणतात.

कसे पाहावे?

उघड्या डोळ्यांनी चंद्रग्रहण पाहणे पूर्णपणे सुरक्षित आहे. जर तुम्हाला त्याची सुंदर दृश्ये जवळून बघायची असतील तर आपण दुर्बिणीची मदत घेऊ शकता. हे उपछाया चंद्रग्रहण आहे, म्हणून ते पाहण्यासाठी, विशेष सौर फिल्टर चष्मा वापराता येईल.

Web Title: Lunar eclipse on 26 may know the complete information nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2021 | 12:20 PM

Topics:  

  • Lunar Eclipse
  • super moon

संबंधित बातम्या

ख्रिश्चन धर्मामध्ये सूर्य ग्रहणाला प्रलय म्हणतात? ‘पृथ्वीचा विनाश…”
1

ख्रिश्चन धर्मामध्ये सूर्य ग्रहणाला प्रलय म्हणतात? ‘पृथ्वीचा विनाश…”

बुर्ज खलिफावर दिसले ‘Blood Moon’चे अद्भुत दृश्य; ‘टाईमलॅप्स’ व्हिडिओ पाहून व्हाल मंत्रमुग्ध
2

बुर्ज खलिफावर दिसले ‘Blood Moon’चे अद्भुत दृश्य; ‘टाईमलॅप्स’ व्हिडिओ पाहून व्हाल मंत्रमुग्ध

भारतात दिसला लालबूंद चंद्र…इतर देशांमध्ये कसं दिसलं खग्रास चंद्रग्रहण; पहा खास फोटो
3

भारतात दिसला लालबूंद चंद्र…इतर देशांमध्ये कसं दिसलं खग्रास चंद्रग्रहण; पहा खास फोटो

Blood Moon eclipse : सप्टेंबरमध्ये पौर्णिमेला आकाशात दिसणार जादुई नजारा; 8 नोव्हेंबर 2022 नंतरचे सर्वात मोठे पूर्ण चंद्रग्रहण
4

Blood Moon eclipse : सप्टेंबरमध्ये पौर्णिमेला आकाशात दिसणार जादुई नजारा; 8 नोव्हेंबर 2022 नंतरचे सर्वात मोठे पूर्ण चंद्रग्रहण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.